'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री सोडणार मालिका?

तारक मेहता मालिकेतील प्रत्येक पात्र ही चर्चेत असतात

Updated: Jul 1, 2021, 10:55 PM IST
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री सोडणार मालिका?  title=

मुंबई : लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' या मालिकेतील प्रत्येक पात्र हे चर्चेत असतं. ही मालिका गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  आता मालिकेतील रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवाला ही मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. जेनिफर ही प्रेग्नंट असल्यामुळे मालिका सोडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

या सर्व चर्चा सुरु असताना जेनिफरने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिने एका मुलाखतीमध्ये म्हटलंय की, 'मी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे मला अनेकांनी फोन आणि मॅसेज येत आहेत. तसेच मी प्रेग्नंट असल्यामुळे मालिका सोडत असल्याचं देखील म्हटलं जात आहे. पण या सगळ्या अफवा आहेत' असं जेनिफर म्हणाली.

काही दिवसांपूर्वी या मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडली. त्यानंतर अभिनेत्री सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारत आहे. आता नेहा पाठोपाठ आणखी एक अभिनेत्री मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

पुढे ती म्हणाली, 'माझ्या पायाला दुखापत झाली आहे. मला चालता देखील येत नाही. त्यामुळे मी दमणला चित्रीकरणासाठी जाऊ शकले नाही. मी मालिकेच्या टीमच्या संपर्कात असते. पण लोक अशा अफवा का पसरवतात मला कळत नाही.' त्यामुळे जेनिफर मालिका सोडणार नाही यावर तिने स्वत: पुर्णविराम दिला आहे.