मुंबई : बॉलिवूड विश्वातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी धक्कादायक घटना समोर आली होती. 'टी सिरीज' कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर एका 30 वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप केला गेला होता. टी सिरीजच्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून 30 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप पिडितेने केला गेला होता. गेली तीन वर्ष भूषण कुमार महिलेवर अत्याचार करत असल्याचं देखील त्या महिलीने तक्रारीत म्हटलं होतं.
म्यूजिक लेबल आणि फिल्म प्रोडक्शन बॅनर टी-सीरीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर बलात्काराच्या आरोपाबाबत आता एक निवेदन दिलं आहे. कुमार यांच्याविरूद्ध दाखल केलेली तक्रार "पूर्णपणे खोटी आणि द्वेषपूर्ण" आहे, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
मार्चमध्ये मदत मागितली गेली, मग खंडणी
भूषण कुमार यांच्याविरोधात डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ३० वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. टी-सिरीजच्या प्रकल्पात काम देण्याचे आश्वासन देऊन २०१७ ते २०२० या काळात र्लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित तरुणीने तक्रारीत केला होता.
दरम्यान पीडित तरूणीवर बलात्कार केल्याची खोटी तक्रार पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आता किशन कुमार यांनी केला आहे. मल्लिकार्जुन पुजारी नावाच्या व्यक्तीने हे पैसे मागितले असं त्यांचं म्हणणे आहे.
पुजारी याने ३ जुलै ते १० जुलै दरम्यान आपल्याकडे पैशांची मागणी केली. तसेच माध्यमांमध्ये बदनामीची धमकी दिली होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी खंडणी मागणे, बदनामी करणे आणि धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण आलं आहे.