मलाइका अरोराने दाखवला आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड लूक, पाहा व्हिडिओ

मलायका तिच्या चाहत्यांच्या कायम संपर्कात रहाण्यासाठी सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते. 

Updated: Jul 18, 2021, 10:48 PM IST
मलाइका अरोराने दाखवला आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड लूक, पाहा व्हिडिओ title=

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मलायका अरोराची अभिनय कारकीर्द खास नव्हती, मात्र तिने आपल्या फिटनेस, बोल्ड अवतार आणि डान्स स्टाईलने सर्वांना वेड लावलं आहे. मलायका तिच्या चाहत्यांच्या कायम संपर्कात रहाण्यासाठी सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिच्या सर्व पोस्टमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेते.

चाहत्याने व्हिडिओ केला एडिट 
नुकताच, आता मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर, नेहमीप्रमाणेच, तीसुद्धा या व्हिडिओमध्ये देखील खूप सुंदर दिसत आहे. मलायकाचा हा व्हिडिओ तिच्या एका फॅनने अनेक लूक एकत्र करुन तयार केला आहे.

मलायकाने व्हिडिओ शेअर केला आहे
यापूर्वीही सौरभने मलायकाचे काही बोल्ड अवतार एडिट केले आहेत. आता मलायकाने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. याचबरोबर तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'वीकेंड फील'. यासोबत तिने सौरभचे आभारही मानले आहेत. मला हे एडिट खूप आवडलं असल्याचं मलायकाने सांगितलं आहे.