वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्री स्वरा भास्कर ट्रोल

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही अभिनयासोबतच सामाजिक मुद्द्यांवर मत मांडल्यामुळे चर्चेत असते. 

Updated: Jul 21, 2022, 09:48 PM IST
वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्री स्वरा भास्कर ट्रोल title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही अभिनयासोबतच सामाजिक मुद्द्यांवर मत मांडल्यामुळे चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिचं लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये स्वरा खूपच बदललेली दिसत आहे. कारण तिचं वजन थोडं वाढलं आहे. वादात सापडलेल्या या अभिनेत्रीचा तिरस्कार करणाऱ्यांनाही संधी मिळाली आहे. वाढलेल्या वजनावरून लोकं तिला ट्रोल करत आहेत.

स्वरा तिच्या ट्वीट्स आणि राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली असली तरी आता तिने दिल्लीतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील फोटोही तिने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्वराचा लूक खूपच बदललेला दिसत आहे. वेट पुटऑन केल्यामुळे लोकं तिला प्रश्नही विचारत आहेत. युजर्स स्वाराची लूकची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये स्वराने बोल्ड ब्लॅक आउटफिट परिधान केला आहे. त्याचबरोबर सिल्व्हर दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला आहे. अभिनेत्री फुल लेडी बॉसच्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. स्वराने सोशल मीडिया स्टार आणि यूट्यूबर अंकुश बहुगुणासोबतही पोज दिली आहे. या फोटोंमध्ये स्वराचा नवा लूक पाहून तिचे चाहतेही हैराण झाले आहेत.

नुकतंच स्वरा भास्करला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. तिने धमकीत आलेलं पत्रही सोशल मीडियावर शेअर केलं होतं. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर स्वरा भास्कर 'शीर कोरमा' आणि 'जहां चार यार' या चित्रपटात दिसणार आहे. ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.