मुंबई : हॉलिवूडनंतर आता बॉलिवूडला देखील कोरोनाची झळ बसत आहे. अभिनेता ऋतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खानच्या बहिणीची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सुझान खानची बहिण फराह खान एक प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे. फरहानेदेखील स्वत:ची कोरोना चाचणी केली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे फराहची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. संबंधित माहिती तिने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. शिवाय सगळ्यांना सुरक्षित राहण्याचं आवाहन ही तिने सोशल मीडियाद्वारे केलं आहे.
Will be quarantined until 29th April 2020 even though I tested negative. Be safe. Be home, This too shall pass
— Farah Khan (@FarahKhanAli) April 16, 2020
कोरोना रिपोर्ट संबंधित बातमी ती म्हणाली, 'कोरोना सारख्या धोकादायक विषाणूची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय अत्यंत खूश आहेत. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असली तरी मी २९ एप्रिलपर्यंत क्वारंटाइनमध्ये असणार आहे. '
Covid news spreads faster than the virus. An in-house staff of mine tested positive today and so am moving him to a facility. Have all tested all at home today as well and are going to be quarantined. Be safe yet strong. This too shall pass.
— Farah Khan (@FarahKhanAli) April 14, 2020
कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. फराह मंगळवारी ती तिच्या एका कर्मचाऱ्याच्या सहवासात आली होती. त्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली होती. कोरोना रुग्णाच्या सहवासात आल्यामुळे तिने स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली.