मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचं कुटुंब सध्या तुफान चर्चेत आहे. कारण आहे सुष्मिताचं ललित मोदीसोबत असलेलं नातं. एकीकडे सुष्मिता सेनच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने एन्ट्री केली आहे, तर दुसरीकडे तिचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा यांचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. चारु आता राजीवसोबत राहत नसली तरी ब्लॉगच्या माध्यमातून कायम अभिनेत्री सुष्मिताचं कौतुक करत असते. एवढंच नाही, तर सुष्मिता देखील चारुला कायम पाठिंबा देत असते.
आता ललित मोदीसोबत नात मान्य केल्यानंतर सुष्मिताने मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीच्या निर्णयमुळे भाऊ राजीवला मात्र मोठा धक्क बसला आहे. रिपोर्टनुसार सुष्मिताने भाऊ राजीव सेनला सोशल मीडियावरुन अनफॉलो केलं आहे.
चारु आणि राजीवच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे सुष्मिताने हा मोठा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. एवढंच नाही तर, सुष्मिता भावासोबत असलेलं नात्याला पूर्णविराम देखील देऊ शकत असल्याच्या चर्चा रंगत आहे.
चारु कायम करते सुष्मिताचं कौतुक
एका मुलाखतीत चारू असोपावने तिची सासू आणि सुष्मिता सेन यांची प्रशंसा केली होती. चारु म्हणाली, 'माझ्या आयुष्यात तीन सर्वोत्तम महिला आहेत. माझी आई, सासू आणि सुष्मिता. या तिघांकडून मी नेहमीच काही ना काही शिकत असते.
चारु पुढे म्हणाली, 'विशेषत: सुष्मिता दीदीकडून.. तिने आपल्या दोन मुलींना एकटीने वाढवल आहे. दोन्ही मुलींना कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. एक स्त्री काहीही करु शकते, याचं उत्तम उदाहरण सुष्मिता सेन असल्याचं देखील चारु यावेळी म्हणाली.
दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून चारु आणि राजीव यांच्यात असलेल्या वादाची चर्चा होत आहे. शिवाय एका मुलीच्या जन्मानंतर त्यांचं नात घटस्फोटापर्यंत देखील पोहोचलं आहे.