'पैशांसाठी ललित मोदींबरोबर' या टीकेवर सुष्मिता सेनची पहिली प्रतिक्रिया! संतापून म्हणाली...

Sushmita Sen : सुष्मिता सेनचे ललित मोदी यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 6, 2023, 02:28 PM IST
'पैशांसाठी ललित मोदींबरोबर' या टीकेवर सुष्मिता सेनची पहिली प्रतिक्रिया! संतापून म्हणाली... title=
(Photo Credit : Social Media)

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या 'ताली' या सीरिजमुळे चर्चेत आहे. सुष्मिता सेन तिच्या फॅशन आणि लूक्ससाठी चर्चेत असते. सुष्मिता सेन ही नेहमीच मोकळेपणानं बोलते आणि आयुष्य जगताना दिसते. सुष्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत राहते आणि त्याशिवाय ती त्यावरही मोकळेपणानं बोलताना दिसते. सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून ललित मोदी यांच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. त्यामुळे तिला गोल्ड डिगर असं म्हणतात. 

सुष्मिता सेननं कधीच याविषयावर काही बोलली नाही. पण जेव्हा आता या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या तेव्हा तिनं यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मितानं ललित मोदी यांच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे. यासोबतचं तिनं गोल्ड डिगर या टॅगवर उत्तर दिलं आहे. थोडक्यात सुष्मितानं तिच्यावर करण्यात येणाऱ्या प्रत्येक कमेंटवर सडेतोड उत्तर देत सगळ्यांना गप्प केले आहे. सुष्मिता याशिवाय पुढे समाजाच्या एका खास वर्गातील लोकांविषयी बोलताना म्हणाली होती की तिच्याविषयी वाटेल ते बोलतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुष्मितानं यावेळी गेल्यावर्षी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'गोल्ड डिगर' या टॅगवर वक्तव्य केलं. तिनं स्वत: विषयी बोलताना सांगितलं की 'बरं झालं अशा प्रकारच्या कमेंट मला पाहायला मिळाल्या आणि मी गोल्ड डिगरवर बोलू शकले. जेव्हा हा टॅग लावण्यात येतो तेव्हा अपमान तर अपमान होतोच पण त्याशिवाय असं नसताना मला अशा गोष्टी बोलल्या जातात याचं वाईट वाटतं. पण काही गोष्टी आहेत ज्याचे कोणाशी घेणं देणं नाही आहे. मला कोणाला हे सांगायची गरज नाही वाटतं की या गोष्टीशी त्यांचं काही घेणं देण नाही आहे. मला तरी सांगायचं आहे की तुम्ही याचा भाग नाही आहात. '

हेही वाचा : नेपोटिझमला सनी देओलचा पाठिंबा? म्हणाला, 'माझे वडील या क्षेत्रात नसते तर...'

सुष्मिता पुढे म्हणाली की, 'जेव्हा मी या गोष्टीवर वक्तव्य केलं, सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली, तेव्हा माझ्याच क्षेत्रातील लोक पुढे येऊन कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात बोलत होते की आम्हाला वाटतं नाही की सुष्मिता सेन यावर काही प्रतिक्रिया देईल. त्यांना असा विचार करण्याची गरजही नाही आहे. जेव्हा मला माझं मत मांडायचं असेल, मी मांडेल. नाही वाटतं असेल तर नाही मांडणार. मला माझं मत मांडायचं की नाही हा विचार करणं माझं काम आहे.' पुढे ती सिंगल असल्याचं सुष्मितानं सांगितलं.