Sushmita Sen ने Heart Attack नंतर शेअर केला Ex-Boyfriend बरोबरचा Video; म्हणाली, "लवकरच मी..."

Sushmita Sen Ex Boyfriend Rohman Shawl: सुष्मिता सेनने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर तिचा एक्स बॉयफ्रेण्डही दिसत असून तिची मुलगीही या व्हिडीओत दिसतेय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 5, 2023, 03:23 PM IST
Sushmita Sen ने Heart Attack नंतर शेअर केला Ex-Boyfriend बरोबरचा Video; म्हणाली, "लवकरच मी..."  title=
sushmita sen share workout video (Photo - instagram/sushmitasen47 Video वरुन साभार)

Sushmita Sen Ex Boyfriend Rohman Shawl: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला (Sushmita Sen) मागील महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. याबद्दलची माहिती सुष्मिताने इन्स्टाग्रामवरुन दिली होती. मात्र आरोग्यासंदर्भातील समस्येमधून सुखरुप बाहेर पडल्यानंतर अभिनेत्रीने आपलं रुटीन लाइफ सुरु केलं आहे. यासंदर्भातील माहिती सुष्मितानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. सुष्मिताने तिचा एक्स बॉयफ्रेण्ड रोहमन शॉलबरोबरचा (Sushmita Sen Ex Boyfriend Rohman Shawl) एक छोटा व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकत्र व्यायाम करताना दिसत असून या व्हिडीओला सुष्मिताने सविस्तर कॅप्शनही दिली आहे. 

'आर्य-3'चं शुटींग

सुष्मिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती मुलगी अलीशाबरोबर व्यायाम करताना दिसत आहे. याच फ्रेममध्ये रोहमन शॉलही (Rohman Shawl) दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून सुष्मिताने चाहत्यांना आपण पुन्हा व्यायामाला सुरुवात केल्याचं सांगितलं आहे. सुष्मिता 'आर्या 3'च्या शुटींगमध्ये व्यस्त असून लवकरच ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. या सिरीजमध्ये आर्या या प्रमुख भूमिकेत सुष्मिताच आहे.

कॅप्शनमध्ये काय म्हटली?

"इच्छाशक्ती हा एकमात्र मार्ग आहे. मला अधिक व्यायाम करण्याची परवानगी मिळाली आहे. मी लवकरच जयपुरला आर्याच्या शुटींगसाठी जाणार आहे. इथे सध्या माझ्या जवळची लोक मला सोबत देत असून माझा आधीचा दिनक्रम सुरळीत करण्यासाठी मदत करत आहेत. अलीशा शोना आणि रोहमन शॉलला खूप सारं प्रेम. माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे," असं सुष्मिताने या व्हिडीओ दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

दोघेही एकमेकांच्या संपर्कात

सुष्मिताने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर रोहमननेही कमेंट केली आहे. "धन्यवाद सुष्मिता मॅडम," असं रोहमन म्हणाला आहे. रोहमन आणि सुष्मिता एकमेकांना 2018 पासून डेट करत होते. मात्र 2021 मध्ये सोशल मीडियावरील एका पोस्टमधून त्यांनी एकमेकांपासून वेगळे होत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतरही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात असून दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एका बेस्ट फ्रेण्ड प्रमाणे रोहमन अनेकदा सुष्मितासोबत दिसून येतो. 

वेब सिरीजमुळे चर्चेत

काही महिन्यांपासून सुष्मिता आयपीएलचे पहिले अध्यक्ष ललित मोदी यांच्याबरोबरच्या नात्यासंदर्भातील खुलाशामुळे चर्चेत होती. या चर्चेनंतर अचानक मागील महिन्यात ती आरोग्यासंदर्भातील बातम्यांमुळे चर्चेत आली. सुष्मितानेच आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं होतं. सुष्मिता ही 47 वर्षांची आहे. चित्रपटसृष्टीमध्ये मागील 2 दशकांपासून सक्रीय असणारी ही अभिनेत्री मागील काही काळापासून वेब सिरीजच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. आर्या आणि आर्या-2 मधील तिच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केल्याचं पहायला मिळालं.