ललीत मोदीशी ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता सेन नव्या नात्यात! EX-Boyfriend सोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Sushmita Sen's Ex Boyfriend Rohman Shawl : सुष्मिता सेन आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  

दिक्षा पाटील | Updated: Nov 3, 2023, 06:39 PM IST
ललीत मोदीशी ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता सेन नव्या नात्यात! EX-Boyfriend सोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल title=
(Photo Credit : Social Media)

Sushmita Sen's Ex Boyfriend Rohman Shawl : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या डेटिंगच्या अफवाह पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. सुष्मिता आणि रोहमन काही काळापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, डिसेंबर 2021 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. मात्र, विभक्त झाल्यानंतर देखील ते मित्र म्हणून अनेकदा एकत्र दिसले आहेत. रोहमनला अनेकदा सेन कुटुंबासोबत पाहायला मिळालं आहे. मात्र, आता त्यांना एकत्र पाहून असं वाटतंय की ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. पापाराझीनं शेअर केलेल्या एका व्हिडीओत रोहमनला सुष्मिताची आगामी सीरिज 'आर्या 3' च्या प्रमोशनवेळी त्यांच्यासोबत कोझी झाल्याचं पाहिलं. 

ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल हे 2023 मध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. विभक्त झाल्यानंतर त्या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले मात्र, त्यांच्यात त्यावेळी असलेली मैत्री ही सगळ्यांना पाहायला मिळाली. मात्र, एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडिावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सुष्मिताही तिच्या 'आर्या' या सीरिजच्या तिसऱ्या भागाच्या प्रमोशन कार्यक्रमात दिसली. व्हिडीओत रोहमन देखील तिच्यासोबत दिसला. व्हिडीओत रोहमन हा सुष्मितासोबत उभा होता इतकंच नाही तर तिच्यासाठी तो प्रोटेक्टिव्ह झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओत रोहमन सुष्मिताच्या मागे उभं रहायला पाहायला मिळतोय. त्यासोबत तिचे क्रु सोबतचे फोटो देखील समोर आले होते. 'रेडियो मिर्ची' सोबत दिलेल्या एका मुलाखतीत रोहमननं त्यांच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं. त्यानं म्हटलं की ते दोघं सोबत चांगले दिसतात. ते विभक्त झाले आहेत की नाही यानं कोणताही फरक पडत नाही. तो पुढे म्हणाला की लोकं काय बोलतात याचा तो विचार करत नाही कारण ते त्यांचं कामचं आहे काही ना काही बोलायचं, त्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. इतकंच नाही तर त्यावरून त्याला कोणाला काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. त्यानं हे देखील सांगितलं की प्रत्येक गोष्टीवर उत्तर देऊ शकत नाही. 

हेही वाचा : शाहरुखच्या वाढदिवशी पृथ्वीकची मन्नत झाली पूर्ण

सुष्मिता सेन ज्या स्तरावर आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागते. त्याच्या प्रमाणे, जेव्हा आपण कोणत्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा आपल्याला त्याच्या सगळ्या गोष्टी आवडू लागतात. हसत रोहमन म्हणाला की सुष्मिता त्याला बुद्धीबळ खेळात हरवते हे त्याला आवडत नाही, कारण त्याला हरणं मुळीच आवडत नाही, पण हे चालतं.