भर अवॉर्ड शोमध्ये सुष्मिता सेनची मुलाने काढली छेड, अभिनेत्रीने असा शिकवला धडा

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अभिनयासोबतच तिच्या स्पष्टवृत्तीमुळे ओळखली जाते.

Updated: Nov 21, 2021, 07:07 PM IST
भर अवॉर्ड शोमध्ये सुष्मिता सेनची मुलाने काढली छेड, अभिनेत्रीने असा शिकवला धडा title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अभिनयासोबतच तिच्या स्पष्टवृत्तीमुळे ओळखली जाते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांसमोर बोलायला ती मागेपुढे पाहत नाही. एकदा सुष्मिता सेनने आपल्यासोबत घडलेल्या अशाच एका घटनेबद्दल लोकांना सांगितलं होतं. जे ऐकून सगळेच थक्क झाले होते. 

सुष्मिता सेनने सांगितलं की, एकदा एका 15 वर्षांच्या मुलाने तिचा विनयभंग केला होता. पण सुष्मिता देखील सहन करणारी नाही, तिने लगेच त्या मुलाला पकडलं आणि त्याला असा धडा शिकवला की तो फ्लर्ट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल.

सुष्मिता सेनने पत्रकार परिषदेत या घटनेचा उल्लेख केला होता. ती म्हणाली, 'एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान, जिथे मीडियाही उपस्थित होती. इतक्या लोकांमध्ये माझ्यासोबत हे घडलं. गर्दीचा फायदा घेत त्याने माझ्यासोबत हे कृत्य केलं. त्याला वाटलं असेल की, त्याने जे काय केलं हे मला माहीत नाही, पण मी त्याचा हात धरला आणि पाहिलं की तो फक्त 15 वर्षांचा मुलगा आहे. मी थक्क झाले'.

असा धडा शिकवला होता
सुष्मिता सेन पुढे म्हणाली, 'मी त्या मुलाला आत घेतलं आणि म्हणाले की, जर मी ही गोष्ट लोकांना सांगितली तर तुझं आयुष्य खराब होईल. दरम्यान, आपण काहीही केलं नाही, असं तो सांगत राहिला. मग त्याने आपली चूक मान्य केली आणि माझी माफी मागितली. यासोबतच त्याने वचनही दिलं की, आता तो असं कधीही करणार नाही'. सुष्मिताने सांगितलं की, मी त्या मुलावर कोणतीही कारवाई केली नाही कारण मला माहित होतं की, असं कृत्य करणं. हा गुन्हा आहे, मनोरंजन नाही