Sushmita Sen on Working with Marathi Actors : लोकप्रिय अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन ही सध्या तिच्या ताली या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तृतीयपंथांच्या हक्कासाठी लढाई लढणाऱ्या गौरी सावंत यांच्या भूमिकेत आपल्याला सुष्मिता दिसत आहे. या वेब सीरिजमधून प्रेक्षकांना सुष्मिताची एक वेगळी बाजू तिचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळत आहे. सुष्मिता सेनच्या या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या सीरिजमध्ये सुष्मिता सेनसोबत अनेक मराठी कलाकारांनी देखील काम केलं आहे. दरम्यान, सीरिजचं प्रमोशन करत असलेल्या सुष्मितानं यावेळी मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगितलं आहे.
सुष्मितानं नुकतीच एका मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे. यावेळी मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव सांगत सुष्मिता म्हणाली की 'मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. ते दर्जेदार कलाकार आहेत. कधी कोणत्या नाटकासाठी जशी तयारी करतो त्याप्रकारे ते त्यांच्या भूमिकांचा अभ्यास करतात. त्या भूमिकेला जगण्याची एक स्किल त्यांच्यात असते. त्यांच्यासोबत काम करायला मज्जा येते पण त्याचसोबत दडपण देखील असतं. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं हे कधीच सोप नसतं.'
गौरी सावंत यांच्या भूमिकेविषयी आणि त्यांनी ज्या प्रकारे सिंगल पेरेंटहूड सांभाळलं, तसंच सुष्मितानं देखील केलं आहे. त्या दोघांमध्ये काय साम्य आहे याविषयी सांगत सुष्मिता म्हणाली, 'फक्त इतकंच नाही तर अनेक गोष्टीं आमच्यात सारख्या आहेत. आम्ही दोघी खूप हट्टी आहोत. आम्ही काही ठरवलं की ते करूनच थांबतो. पण त्यातही गौरी यांनी जो संघर्ष केला आहे तो खूप कठीण आहे. त्यांनी तृतीयपंथी यांना त्यांचं स्थान किंवा अस्तित्व मिळवून देण्यासाठी खूप मोठी लढाई लढली आहे.'
हेही वाचा : 'इंडस्ट्रीमध्ये माझ्या कुटुंबाला कायम दुय्यम स्थान...', म्हणत ढसाढसा रडले धर्मेंद्र
पुढे मराठी भाषा शिकण्याविषयी सुष्मितानं सांगितलं. सुष्मिता हसत म्हणाली, 'रवी जाधव यांनी तिला ज या अक्षराचे केले जाणारे वेगवेगळे उच्चार शिकवले. मराठीत बोलण्यासाठी मी मराठीतील शिव्याही शिकले.' दरम्यान, सुष्मिताच्या ताली या सीरिजविषयी बोलायचे झाले तर तिच्या या सीरिजनं सगळ्यांच्या मनावर राज्य केले आहे. या सीरिजमध्ये तिचा अभिनय एका वेगळ्याच लेव्हलवर तिनं नेऊन ठेवला आहे असे अनेकांचे म्हणणे आहे.