मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण आता दोघांच्या पुन्हा हिरवा कंदिल मिळाला असल्याच्या चर्चा रंगत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसंच आहे. कारण अभिनेत्रीच्या फॅमिली फोटोमध्ये रोहमन देखील दिसला. त्यामुळे सुष्मिता आणि रोहमन पुन्हा एकत्र झाले का? असा प्रश्न चाहत्यांकडून विचाण्यात येत आहे.
सुष्मिताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या कुटुंबासोबत रोहमन देखील दिसत आहे. फोटो पाहून लोक अभिनेत्रीच्या लग्नाबाबत अंदाज लावत आहेत.
पण सुष्मिता आणि रोहमन लग्न करणार नसून एका खास कारणामुळे दोघे एकत्र आले. सुष्मिता सेन मिस युनिव्हर्सचा ताज जिंकणारी पहिली भारतीय होती.
जेव्हा मिस युनिव्हर्सचा ताज घातला त्या दिवसाला 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुष्मिता सेनने हा खास दिवस तिच्या जवळच्या लोकांसोबत साजरा केला. यावेळी अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल देखील सुष्मितासोबत होता.
यावेळी घरातील सर्वात छोटा सदस्य देखील सुष्मिताच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आला. सुष्मिताच्या आनंदात सहभागी होणाऱ्या लहान बाळाचं नाव झियाना आहे.
झियाना ही सुष्मिताचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा यांची मुलगी आहे. सुष्मिताने तिच्या भाचीसोबत चांगला वेळ घालवला. फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'बुवा की जान.'