सुष्मिता सेनच्या प्रेमाची कुणाला नाही किंमत? तब्बल 10 मुलांकडून धोका

सुष्मिताचा 12 वा बॉयफ्रेड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप 

Updated: Dec 24, 2021, 11:15 AM IST
सुष्मिता सेनच्या प्रेमाची कुणाला नाही किंमत? तब्बल 10 मुलांकडून धोका title=

मुंबई : Sushmita Sen Boyfriend’s List: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा इंस्टाग्राम अकाऊंटवरील फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहमन शॉलसोबत तिचा ब्रेकअप झाला. रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन यांनी खूप वेळ एकत्र घालवला. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. काही काळ एकत्र राहिल्यानंतर दोघं वेगवेगळ्या मार्गांवर निघून गेले. जाणून घेऊया सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपबद्दल 

रोहमन शॉल 

रोहमन शॉल (Rohman Shawl)

सुष्मिता सेने पहिल्यांदा रोहमन शॉलला एका फॅशन शोमध्ये भेटली होती. दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडली आणि डेट करायला सुरुवात केली. या दोघांच्या नात्याची इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली होती, मात्र आता दोघेही वेगळे झाले आहेत.

ऋतिक भसनी 

ऋतिक भसीन (Ritik Bhasin)

सुष्मिता सेनने हृतिक भसीनला जवळपास 4 वर्षे डेट केले होते. दोघेही लग्न करणार असून मुंबईत घर शोधत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली.

बंटी सचदेवा 

बंटी सचदेवा (Bunty Sachdeva)

सुष्मिता सेननेही बंटी सचदेवाला डेट केले होते. असे म्हटले जाते की बंटीने सुष्मिताची फसवणूक केली होती, त्यानंतर अभिनेत्रीने तिला सोडले.

साबिर भाटिया 

साबिर भाटिया (Sabeer Bhatia)

सुष्मिता सेन हॉटमेलचे फाऊंडर साबिर भाटिया यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 

संजय नारंग 

संजय नारंग (Sanjay Narang)

सुष्मिता सेन लोकप्रिय व्यावसायिक संजय नारंग यांना देखील डेट करत होती. या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र सुष्मिता लग्नाला तयार नव्हती. 

विक्रम भट्ट 

विक्रम भट्ट (Vikram Bhatt)

सुष्मिता सेन लोकप्रिय दिग्दर्शक विक्रम भट्ट याना डेट करत होती. या दोघांची भेट 'दस्तक' सिनेमाच्या सेटवर झाली.

वसीम अकरम  

वसीम अकरम (Wasim Akram)

पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरमसोबत सुष्मिता सेनचं नाव जोडलं गेलं.या दोघांनी काही महिने एकत्र घालवले त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. 

इम्तियाज खत्री 

इम्तियाज खत्री (Imtiaz Khatri)

सुष्मिता सेनने इम्तियाज खत्रीला डेट केलं. या दोघांबाबत खूप चर्चा झाली. मात्र हे दोघं लवकरच वेगळे झाले. 

मानव मेनन 

मानव मेनन (Manav Menon)

सुष्मिता सेन ऍड फिल्ममेकर मानव मेननसोबत सिरीयस रिलेशनशिपमध्ये होती. मात्र यांचं नात फार काळ टिकलं नाही. 

मुदस्सर अजीज 

मुदस्सर अजीज (Mudassar Aziz)

सुष्मिता सेन आणि दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांचं नातं फार काळ टिकलं नाही. खूप काळ डेट केल्यानंतर हे दोघं वेगळे झाले.  

रणदीप हुड्डा (Randeep Hudda)

रणदीप हुड्डा 

रणदीप हुड्डा आणि सुष्मिता सेन या दोघांची ओळख कर्माच्या सेटवर झाली. दोघं इथेच एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी एकमेकांना डेट केलं. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही.