शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्याकडून 'ही' अभिनेत्री प्रेग्नेंट

फार कमी लोकांना माहिती आहे हे सत्य   

Updated: Dec 24, 2021, 12:23 PM IST
शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्याकडून 'ही' अभिनेत्री प्रेग्नेंट  title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक वेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते असतात. बॉलिवूडमध्ये आज अनेक अभिनेते आहेत, पण बिग बींची सर कोणालाचं येणार नाही. बिग बींनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. बिग बींच्या हीट  ठरलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'शोले...'  

जय-वीरू, गब्बरपासून ते धन्नो आणि कालियापर्यंत, सिनेमातील प्रत्येक पात्र आजही लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. सिनेमातील डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत. पण सिनेमाच्या शुटिंग दरम्यान एक अशी घटना घडली ज्यावर कोणी लगेच विश्वास ठेवू शकणार नाही. 
   
सिनेमात अमिताभ बच्चन यांनी जयची भूमिका साकारली होती. तर त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी जया बच्चन यांनीही सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. जया आणि अमिताभ यांच्या जबरदस्त अभिनयाची तर सर्वांनाच कल्पना आहे, मात्र सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ यांच्या चुकीमुळे जया प्रेग्नेंट राहिल्या, हे फार कमी लोकांना माहीत असेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एक काळ असा होता की अमिताभ आणि रेखाच्या रिलेशनशिपचे किस्से रोज ऐकायला मिळत होते पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही. यादरम्यान जया आणि बिग बी  दोघांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी 1973 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सांगायचं झालं तर शोलेच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न झाले. यादरम्यान जया गरोदर राहिल्या. मात्र जया बच्चन गरोदर असूनही त्यांनी सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी मुलगी श्वेता यांना जन्म दिला.