मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रियाविरोधात पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली होती. केके. सिंह यांनी केलेल्या तक्रारीमुळे सुशांत आत्महत्या प्रकरणाला चांगलीच कलाटणी मिळाली होती. मुंबई आणि बिहार पोलिसांनंतर या प्रकरणाची चौकशी अखेर बुधवारी सीबीआयकडे सोपावण्यात आली आहे. सुशांत आत्महत्या प्रकारणाची चौकशी सीबीआयकडे सोपावल्यानंतर त्याच्या बहिणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
ट्विट करत ती म्हणाली, 'देवाचे आभार... देवाने आमची प्रार्थना ऐकली आहे. परंतु ही फक्त एक सुरूवात असली तरी सत्याच्या दिशेने पहिली वाटचाल आहे. मला सीबीआयवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगत तिने #Victoryoffaith #GlobalPrayersForSSR #Wearefamily #CBITakesOver हे हॉश टॅग वापरले आहेत.
Thank you God! You have answered our prayers!! But it is just the beginning... the first step towards the truth! Full faith on CBI!! #Victoryoffaith #GlobalPrayersForSSR #Wearefamily #CBITakesOver
— shweta singh kirti (@shwetasinghkirt) August 19, 2020
बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. बिहार पोलिसांचा अर्ज वैध असल्याचं सर्वाच्च न्यायालयाने म्हटलंय. मुबंई पोलिसांनी, महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावं.
तसंच सर्वाच्च न्यायालयाकडून केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडिया आणि विविध स्तरांमधून सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीाय चौकशी व्हावी आशी मागणी करण्यात येत होती. अखेर बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सुनावला आहे.