मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात सतत नव नवीन खुलासे होत आहेत. 'झी मीडिया'ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशांत याच्या नोकराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रात्री कोणतीही पार्टी झालेली नाही. बिहार पोलिसांनी सुशांतच्या नोकराची चौकशी केली त्यावेळी त्याने स्पष्ट सांगितले, आत्महत्येच्या पहिल्या रात्री सुशांतच्या घरी कोणतीही पार्टी झालेली नाही.
सुशांतच्या नोकराने बिहार पोलिसांना सांगितले की, १३ जून रोजी रात्री जेवण करुन सुशांत त्याच्या बेडरुममध्येच होता. १४ जून रोजी सुशांतला दररोजाप्रमाणे पहाटे उठला. त्या रात्री तो बाहेर गेला नाही ना घरी कुठली पार्टी झाली.
यापूर्वी मुंबई पोलिसांनीही पार्टी झाली नसल्याचे अधिकृतपणे नकारले होते. सुशांतच्या कॉल डिटेलवरून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतने रात्री उशिरा दोन वाजताच्या सुमारास दोन फोन केले होते. रिया चक्रवर्ती आणि तिचा मित्र महेश शेट्टी यांना. मात्र, त्यांनी हे फोन कॉल उचलले नव्हते. त्यामुळे त्या रात्री दोघांशीही त्याचे संभाषण होऊ शकले नाही.
यापूर्वी, दिवंगत अभिनेते क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani) यांने मुंबई पोलिसांना एक मेल केला. त्यात लिहिले आहे की, रिया चक्रवर्ती यांच्याविरुद्ध वक्तव्य करण्यासाठी सुशांतच्या कुटुंबीयांकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्याला या बद्दल काहीही माहिती नाही.
सिद्धार्थने मुंबई पोलिसांना एक ईमेल पाठवला, “२२ जुलै रोजी मला ओपी सिंग, मितू सिंग आणि मी रिया चक्रवर्ती आणि सुशांतसमवेत माउंट ब्लांक येथे राहत होतो असा एक अज्ञात नंबर असलेल्या सुशांतच्या कुटुंबीयांचा कॉन्फरन्सिंग कॉल आला. त्यावेळी सुशांत आणि रिया यांच्या खर्चाबाबत विचारण्यात आले. त्यानंतर २७ जुलै रोजी मला ओपी सिंग यांचा दुसर्या अज्ञात क्रमांकाचा फोन आला आणि त्यांनी मला रिया चक्रवर्तीविरोधात बिहार पोलिसांकडे निवेदन करण्यास सांगितले. मला कॉल येईल असं मला सांगण्यात आलं होतं, त्यानंतर मलाही एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला, पण सेकंदानंतर तो कॉल कट झाला आणि काहीच बोलणं झालं नाही. मला माहित नाही की, रियाविरुद्ध असे विधान करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसंदर्भात महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये तू-तू-मैं-ही सुरु आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यास महाराष्ट्र सरकारने नकार दिला आहे.