मुंबई : अभिनेता सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणात (Sushant Singh Rajput's death case) तपास करत असलेल्या सीबीआयला (CBI team investigating) त्याचा मृत्यू हा आत्महत्येने झाला असल्याचे वाटत आहे. आतापर्यंतच्या चौकशीत असे कुठलेच धारेदोरे सापडले नाहीत की सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले गेले किंवा त्याची हत्या केली. सीबीआयबाबतची ही माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
दरम्यान, आज सीबीआय रिया चक्रवती (Rhea Chakraborty) हिच्या वडिलांची इंद्रजीत चक्रवर्तींची पुन्हा एकदा चौकशी करणार आहेत. बाकी कुटुंबातल्या सदस्यांना चौकशीसाठी बोलवले नसल्याचीही माहिती मिळत आहे. मंगळवारी रियाच्या आईवडिलांसह आठ जणांची चौकशी सीबीआयने केली. आईवडिलांकडून रिया-सुशांतच्या नात्याबद्दल सीबीआयने माहिती जाणून घेतली.
सोमवारी सीबीआयने रिया चक्रवर्ती हिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती यांच्यासह आठ जणांची मुंबईतील डीआरडीओ गेस्ट हाऊसवर चौकशी केली. सुशील आणि रियाच्या इंद्रजित आणि संध्या चक्रवर्ती यांच्या संबंधांबाबत सीबीआयने चौकशी केली.
सुशांत प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय आता आत्महत्येच्या घटनेची चौकशी करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या मृत्यूमागे कोणताही कट दिसत नसल्याचे सीबीआयला वाटत आहे. पुरावा आणि तपासणीच्या आधारे सीबीआयला हे प्रकरण आत्महत्याच वाटत आहे.
सुशांत प्रकरणात ड्रग अँगलचा तपास करणार्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) प्रथम अटक केली. एनसीबीने प्रथम मुंबईतील औषध पुरवठादाराची चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीला रियाचा भाऊ शोविक माहित आहे.