मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. याआधी मुंबई पोलिसांनीही या प्रकरणाशी संबंधित अनेक लोकांची चौकशी केली आहे. चौकशीदरम्यान या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. सुशांतचा कुक नीरजनेही काही धक्कादायक खुलासे केले आहेत. मृत्यूच्या काही दिवस आधी सुशांतसाठी जॉइंट्स रोल बनवून ठेवले असल्याचं नीरजने सांगितलं. मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर सिगारेट बॉक्स चेक केला असता, तो रिकामा असल्याचं नीरजने सांगितलं.
एका रिपोर्टनुसार, नीरजने मुंबई पोलिसांना 3 पानी जबाब दिला असून यात त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीरजने यात सांगितलं की, एप्रिल 2019 मध्ये त्याने सुशांतच्या घरी हाऊसकिपिंग स्टाफ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. साफ-सफाई, कुत्र्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणं, सुशांतचं जेवण बनवणं ही कामं तो करायचा. ज्यावेळी सुशांतकडे काम करण्यास सुरुवात केली, त्यावेळी रजत मेवाती, सिद्धार्थ पिठानी, आयुष, सॅम्युअल मिरांडा, आनंदी, सॅम्युअल हाओकिप, आकाश खासू आणि केशव हे सुशांतसाठी काम करायचे. त्यानंतर सुशांत वांद्र्यात शिफ्ट झाला.
सुशांत आठवड्यातून एक-दोन वेळा आनंदी, रिया आणि आयुषसह पार्टी करायचा. तो दारु, गांजा ओढायचा. सॅम्युएल जॅकब सुशांतसाठी जॉइंट रोल करायचे, कधी-कधी मीही जॉइंट करुन देत. मृत्यूपूर्वी एका सिगरेट बॉक्समध्ये तीन दिवस रोल बनवून ठेवले होते, मात्र मृत्यूनंतर तो बॉक्स खाली असल्याचं नीरजने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं.