Sushant Singh Rajput : सुशांतनंतर तीन वर्षांनी 'तो' ही गेला सोडून, सुशांत सिंहच्या कुटुंबियांवर पुन्हा दु:खाचा डोंगर..

Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंहच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण सुशांतनंतर तीन वर्षांनी 'तो' ही सोडून गेला आहे. 

Updated: Jan 17, 2023, 05:10 PM IST
Sushant Singh Rajput : सुशांतनंतर तीन वर्षांनी 'तो' ही गेला सोडून, सुशांत सिंहच्या कुटुंबियांवर पुन्हा दु:खाचा डोंगर.. title=

Sushant Singh Rajput Pet Dog Death : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) 14 जून 2020 रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या (Sushant Singh Rajput's death) केली. या घटनेला आता अडीच वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. पण त्याच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाही. त्याच आता सुशांतच्या मृत्यूच्या 3 वर्षानंतर त्याचा पाळीव कुत्रा Fudge चा मृत्यू झाला आहे. याबाबत सुशांतची बहिण प्रियंका सिंहने ट्विटरवर या गोष्टीची माहिती दिली. 

बहिणीने शेअर केली भावूक पोस्ट 

प्रियंका सिंहने (Priyanka Singh) पाळीव कुत्र्याचा (Fudge) फोटो शेअर करत या मृत्यूची माहिती दिली. प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये सुशांत सिंह राजपूत आणि Fudge दोघे दिसत आहेत. फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिलं, किती काळ लोटला फज... तू आता तुझ्या मित्राकडे पोहोचलास, स्वर्गात. मन तुटलं. 

सुशांत सिंहच्या निधनानंतर फजचे (Fudge) अनेक व्हिडिओ व्हायरल होत होते. सुशांत आणि फज खूप जवळ होते. दोघे खूप मस्ती करायचे आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचे. पण सुशांतच्या मृत्यूनंतर फजची अवस्था वाईट झाली होती. तो शांतपणे जगू लागला होता आणि आता त्याच्या मृत्यूने सुशांतच्या चाहत्यांना दु:ख झाले आहे.

सुशांतच्या चाहत्यांकडून श्रद्धांजली

सोशल मीडियावर दुसऱ्या युजरने लिहिलं, ते स्वर्गामध्ये पुन्हा भेटले. मला माहिती आहे की, आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर पाळीव प्राणी अधिक काळ जिवंत राहत नाहीत. आणखी एका युजरने लिहिलं, दीदी तुम्हाला सांगू शकत नाही की, माझं मन किती दुखावलं गेलं आहे. या वृत्ताने पुन्हा एकदा लाखों हृदय तुटले आहेत. सुशांतशी संबंधित प्रत्येक गोष्ट माझ्या मनाजवळ आहे. मी केवळ हेच सांगू शकेन की, तुम्ही मजबूत राहा. काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही. तुला खूप आठवण करेन फज.