सुशांत सिंह राजपूतचे Kissing Scenes पाहून मी खूप रडले होते! अंकिता लोखंडेचा खुलासा

Ankita Lokhande On Sushant Singh Onscreen Romance: सुशांत आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्या नात्याबद्दलच्या अनेक बातम्या समोर आल्या. आता अंकिता लोखंडेने आणखी एक खुलासा केला आहे. 

Updated: Dec 26, 2023, 01:39 PM IST
सुशांत सिंह राजपूतचे Kissing Scenes पाहून मी खूप रडले होते! अंकिता लोखंडेचा खुलासा title=

Ankita Lokhande On Sushant Singh Onscreen Romance: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 14 जून 2020 रोजी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा मृत्यूच्या 3 वर्षानंतरही सुरु आहे. सुशांत सिंग बॉलीवूडच्या नेपोटिझ्मचा बळी पडल्याच्या चर्चाही सोशल मीडियात रंगत असतात. या सर्वात सुशांत आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्या नात्याबद्दलच्या अनेक बातम्या समोर आल्या. आता अंकिता लोखंडेने आणखी एक खुलासा केला आहे. 

सलमान खानच्या बिग बॉस 17 या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक मंडळी आपल्या आयुष्याबद्दल वेगवेगळे खुलासे करत असातात. यामुळे सर्वांना बरीच प्रसिद्धी मिळत असते. अंकिता लोखंडेदेखील या शोचा हिस्सा आहे. शोमध्ये अंकिता खेळापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री अंकिता तिच्या आणि सुशांतच्या लव्ह लाईफवर काहीतरी ना काही बोलत राहते. ती आपल्या गेमसाठी सुशांतच्या नावाचा वापर करत असल्याची टीका तिच्यावर प्रतिस्पर्धी करत असाता. दरम्यान अंकिताने कधी न सांगितलेला किस्सा बिग बॉसच्या घरात सांगितला आहे. 

अंकिता लोखंडेने या शोमध्ये अनेकदा सुशांत सिंग राजपूतचा उल्लेख करून तिच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्यात झालेल्या ब्रेकअपवरही अभिनेत्री बोलली आहे. सुशांत सिंग राजपूतचा ऑनस्क्रीन रोमान्स आपल्याला आवडत नसल्याचे तिने शो दरम्यान सांगितले. 

बिग बॉस 17 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार आणि आयशा खान गार्डन परिसरात बोलताना दिसले. यादरम्यान अभिषेक कुमारने आपल्या नात्याबद्दल एक खुलासा केला., 'उदारियां'च्या सेटवर ईशा मालवीयाचे खोटे लग्न झाले तेव्हा मी वेडा झालो होतो. यानंतर अंकिता लोखंडेने तिची आठवण सांगितली. 

'माझ्यासोबतही असंच घडल्याची आठवण अंकिताने सांगितली. जेव्हा सुशातंसिंग राजपूतचा 'शुद्ध देसी रोमान्स' सिनेमा आला तेव्हा सुशांतने माझ्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले होते. मी त्याचे रोमँटिक सीन पाहू शकणार नाही आणि मला राग येईल, हे सुशांतला माहिती होते. हॉलमध्ये चित्रपट पाहत असताना, मी पुन्हा पुन्हा माझी खुर्ची पकडत होते, अशी आठवण अंकिताने सांगितली.

'जेव्हा सुशांतने मला पाहिले तेव्हा तो चित्रपट सोडून पळून गेला. संपूर्ण चित्रपट पाहून मी माझ्या घरी गेले आणि तिथे खूप रडले. त्यानंतर सुशांतही रडायला लागला. यानंतर मला माफ कर गुगु, मला माफ कर गुगू. मी आता ते करणार नाही, अशी विनवणी तो करु लागला. यानंतर जेव्हा आम्ही रोमँटिक झालो तेव्हा माझ्या मनात तेच सीन सुरु झाले आणि मग मी त्याला ढकलून दिले, असे तिने सांगितले.

तुम्ही तुमच्या जोडीदाराला दुसऱ्यासोबत पाहता तेव्हा तुम्हाला विचित्र वाटू लागते, तेव्हा असे होते असे तिने सांगितले. आता तीच गोष्ट माझ्या मनात अडकली आहे आणि ती बाहेर येत नाहीये. 

यानंतर अंकिता लोखंडेने आणखी एक खुलासा केला. विकी जैन कधीही माझे रोमँटिक सीन्स पाहत नाही. सीन बघून तो घाबरतो, असेही अंकिताने पुढे सांगितले.