Suryavanshi ची 2 आठवड्यात मोठी कमाई, आता 'बंटी और बबली 2' सोबत टक्कर

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर सूर्यवंशी (Suryavanshi) चित्रपटाने गुरुवारी (18 नोव्हेंबर) थिएटरमध्ये दोन आठवडे यशस्वीरित्या पूर्ण केले. 

Updated: Nov 19, 2021, 08:22 PM IST
Suryavanshi ची 2 आठवड्यात मोठी कमाई, आता 'बंटी और बबली 2' सोबत टक्कर title=

मुंबई : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर सूर्यवंशी (Suryavanshi) चित्रपटाने गुरुवारी (18 नोव्हेंबर) थिएटरमध्ये दोन आठवडे यशस्वीरित्या पूर्ण केले. या चित्रपटाने लॉकडाऊनमुळे घसरलेल्या चित्रपट व्यवसायाला भक्कम आधार आणि आशा दिली आहे. लॉकडाऊनमुळे प्रेक्षक चित्रपटगृहांपासून नक्कीच दूर गेले होते हे सूर्यवंशींच्या कलेक्शनने (Suryavanshi collection) सिद्ध केले. दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये चित्रपटगृहे सुरू झाल्याने प्रेक्षकांनीही घराबाहेर पडायला सुरुवात केली आणि सूर्यवंशीच्या रिलीजला पाठिंबा दिला.

रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित या चित्रपटाने गुरुवारी 3.16 कोटींचे कलेक्शन केले होते, त्यानंतर 14 दिवसांचे म्हणजेच दोन आठवड्यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) 166.23 कोटींवर गेले आहे. हा चित्रपट दिवाळीच्या एका दिवसानंतर 5 नोव्हेंबर रोजी सुमारे 3500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. सूर्यवंशीने 26.29 कोटींची ओपनिंग घेतली आणि ओपनिंग वीकेंडमध्ये 77.08 कोटी कमावले. चित्रपटाने पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आणि पहिल्या आठवड्यात 120.67 कोटी कमावले. 12 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या वीकेंडमध्ये, सूर्यवंशीने 30.57 कोटींचे निव्वळ कलेक्शन केले, त्यानंतर 10 दिवसांचे कलेक्शन 151.23 कोटींवर गेले.

सूर्यवंशीने चांगली कमाई केल्यानंतर आता बंटी और बबली 2 रिलीज होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी सिनेमा रिलीज झाला. बंटी और बबली 2 (Bunty anur Bubly 2) हा यशराज बॅनरचा चित्रपट असून त्यात सैफ अली खान (Saif ali khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukharji) यांच्यासह नवोदित सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत.

'खिलाडी'नंतर बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना खेचण्याची जबाबदारी 'अनारी'वर येऊन पडली आहे. बंटी और बबली 2 देशभरात 1800 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे, तर ओव्हरसीजमध्ये हा सिनेमा 700 स्क्रीन्सवर लॉन्च झाला आहे, जी सूर्यवंशी पेक्षा लहान रिलीज आहे.