एकवेळ जेवणासाठी पैसे नव्हते; नर्स बनण्याची स्वप्न घेवून आलेली अभिनेत्री बनली पॉर्नस्टार

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकताच तिचा 41 वा वाढदिवस साजरा केला आहे. 

Updated: May 14, 2022, 06:42 PM IST
एकवेळ जेवणासाठी पैसे नव्हते; नर्स बनण्याची स्वप्न घेवून आलेली अभिनेत्री बनली पॉर्नस्टार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकताच तिचा 41 वा वाढदिवस साजरा केला आहे. सनीने अल्पावधीतच तिच्या डान्स आणि अभिनयाने बॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच तिच्या चाहत्यांमध्येही स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आजच्या काळात तिची ओळख पॉर्न स्टार म्हणून नाही तर एक अभिनेत्री म्हणून आहे.  जिला याशिवाय इतर कोणत्याही परिचयाची गरज नाही. सनीसाठी इथपर्यंत प्रवास करणं सोपं नव्हतं पण तरीही तिने हार मानली नाही आणि हे स्थान मिळवलं. सनी लिओनी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

तिला तिचा बहुतेक वेळ कामाव्यतिरिक्त पती आणि मुलांसोबत घालवायला आवडतो. सनी तिची तीन मुले आणि पतीसह मुंबईत राहते. सनीने 2012 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि आता ती एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. याआधी सनी अडल्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामागील कारण म्हणजे तिच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते. सनीचे खरं नाव करणजीत कौर असून ती पंजाबी सीख कुटुंबातील आहे.

सनी भलेही तिच्या कुटुंबापासून म्हणजेच तिच्या आई-बाबांपासून दूर असेल. पण ती अनेकदा तिच्या भावासोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की पहिल्यापासूनच सनीला ना अभिनेत्री व्हायचं होतं ना पोर्न स्टार. होय, तिला खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करायची होती. सनीला नर्स म्हणून काम सुरू करायचं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. सनीही नर्स होण्यासाठी शिकत होती. पण वेळ आणि परिस्थितीने तिला वेगळंच करायला भाग पाडलं.

सनीला पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागला. त्यासाठी सनीने असा मार्ग निवडला, ज्यामध्ये ती अडकत राहिली. पॉकेटमनी कव्हर करण्यासाठी, सनी लिओनीने अडल्ट चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि जर्मन बेकरीमध्ये वेट्रेस म्हणूनही काम केलं. सनी लिओनीने तिच्या एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, अडल्ट चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे लोकं तिच्याशी अन्यायकारक वागायचे. सनीने सांगितलं की, तिने वयाच्या १९ व्या वर्षापासून पॉर्न इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती.

यासोबतच सनीने तिच्या मुलाखतीत ती बायसेक्शुअल असल्याचाही खुलासाही केला होता. हा खुलासा धक्कादायक असला तरी हे खरं आहे.  वयाच्या १८ व्या वर्षी तिला समजलं की ती मुलगा आणि मुलगी दोघांकडेही आकर्षित होऊ शकते. सनीने पॉर्न फिल्म्समध्ये काम करण्यासोबतच तिचं दिग्दर्शनही केलं. सनीने 'जिस्म 2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. सनी लिओन ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री होती जिने तिच्या सहकलाकाराची एचआयव्ही चाचणीची मागणी केली होती.