'ॲनिमल' पाहून सनी लियोनीचा पालक मंडळींना सल्ला, 'त्यांना यातला फरक माहिती असायला हवा'

Sunny Leone on Animal : सनी लियोनीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' या चित्रपटाविषयी वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 19, 2024, 04:13 PM IST
'ॲनिमल' पाहून सनी लियोनीचा पालक मंडळींना सल्ला, 'त्यांना यातला फरक माहिती असायला हवा' title=
(Photo Credit : Social Media)

Sunny Leone on Animal : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' या चित्रपटाला ए सर्टिफिकेट देऊन प्रदर्शित करण्यात आलं होतं. अनेकांनी चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतरह त्यानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले. संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अॅक्शन आणि ड्रामा भरपूर आहे. दरम्यान, या चित्रपटावर दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता अभिनेत्री सनी लियोनीनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. आता तिनं केलेल्या या वक्तव्यानं सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. 

सनी लियोनीनं तिचा एआय रेप्लिका अवतार लॉन्च करताना दिसली. या लॉन्च इव्हेंटमध्ये सनीनं एक मीडियाशी चर्चा करत असताना 'ॲनिमल' या चित्रपटाला मिळालेल्या नकारात्मकतेवर विचार मांडला आहे. चित्रपटाचं यश आणि त्याच्यावर घेण्यात येणारा आक्षेपावर तिचा विचार मांडत सांगितले की चित्रपटांविषयी चांगली गोष्ट ही आहे की 'आमच्याकडे दाखवण्यासाठी किंवा नाही दाखवण्यासाठी ऑप्शन असतो. मात्र, माझं म्हणणं आहे की मनोरंजन च्रकीय आहे आणि आता सगळं परत येतं. आधी मंदी होती आणि आता लोक थिएटरमध्ये परत जाण्यासाठी, तिकिट काढण्यासाठी आणि कुटुंबासोबत वेळ व्यथित करण्याची इच्छा आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सनीनं 'ॲनिमल' या चित्रपटाचं समर्थन केलं आणि म्हणाली की 'प्रेक्षकांना ही आजादी मिळाली पाहिजे की कोणते चित्रपट पाहायचे आहेत. त्याशिवाय तो चित्रपट पाहायचा की नाही हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. दरम्यान, सनीनं हे देखील सांगितलं की सगळ्यांनी जे काही पाहताता किंवा वाचतात त्या सगळ्यावर विश्वास ठेवायला नको किंवा त्यावर विश्वास ठेवायला नको.'

सनीनं पुढे म्हटलं की 'कोणतीही व्यक्ती काहीही लिहिते त्यातील सगळ्याच गोष्टींवर आपण नेहमी सहमत होण्याची गरज नाही. कारण ती आपल्यावर अवलंबून आहे. सगळ्यात शेवटी सनीनं हे देखील सांगितलं की आई-वडिलांनी हे सुनिश्चित करायला हवं की त्यांची मुलं असं काही बघत आहेत. त्यांच्या मुलांना या सगळ्यातील फरक माहित असायला हवा.'

हेही वाचा : अयोध्येत इतकी गर्दी की लक्ष्मणालाच रूम मिळेना! हॉटेल बुकिंगवरून नाराज झाले सुनील लहरी...

सनी देओलनं पुढे सांगितलं की जर तरुण लोक हे पाहत आहेत तर आपलं कुटुंब, मित्र आणि आई-वडिलांना यावर चर्चा करण्याची गरज आहे. तुम्ही एक पाऊल पुढे घ्यायला हवं आणि म्हणायला हवं की ठीक आहे, ही फक्त एक कल्पना आहे आणि खऱ्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टींवर नाही. आपण आपल्या मुलांना, तरुण मुलींना आणि मुलांना शिकवायला हवं की जीवन कसं असायला हवं आणि आपण एकमेकांची काळजी घ्यायला हवी.