नवरात्रीच्या जाहिरातीमुळे सनी लिओनीवर भडकले 'गुजराती'

पॉर्न स्टार ते बॉलीवूड स्टार बनलेल्या सनी लिओनीवर सांस्कृतिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. गुजरातमधील काही शहरातील मॅनफोर्सतर्फे  नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे मोठे होर्डिंग्ज पाहायला मिळत आहे. सनी लिओनचे मोठे चित्रही या होर्डिंगमध्ये दिसत आहेत. तथापि, होर्डिंगमध्ये कुठेही कंडोम शब्दाचा वापर केला नाहीए. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 19, 2017, 04:48 PM IST
नवरात्रीच्या जाहिरातीमुळे सनी लिओनीवर भडकले 'गुजराती'  title=

नवी दिल्ली: पॉर्न स्टार ते बॉलीवूड स्टार बनलेल्या सनी लिओनीवर सांस्कृतिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. गुजरातमधील काही शहरातील मॅनफोर्सतर्फे  नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे मोठे होर्डिंग्ज पाहायला मिळत आहे. सनी लिओनचे मोठे चित्रही या होर्डिंगमध्ये दिसत आहेत. तथापि, होर्डिंगमध्ये कुठेही कंडोम शब्दाचा वापर केला नाहीए. 

यामध्ये मॅनफोर्सची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर सनी लिऑनसोबत 'प्ले, लव आणि नवरात्री' या टॅगलाइन मॅगझिनमध्ये ठळक दिसत आहेत. 

काही संघटनांनी यासंबधीची तक्रार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे करत हे होर्डिंग्ज काढण्याची मागणी केली आहे.

कॉन्फिडिरेशन ऑफ आल इंडिया ट्रेडर्स ने पासवान यांना यासंबधीचे पत्र लिहिले आहे. उत्सवाच्या दिवसात गुजरातमधील बहुतांश शहरांमध्ये दिसणारे हे होर्डिंग्ज सांस्कृतिक भावनांविरुद्ध आहेत. तरुणांना मॅनफोर्स कंडोम घेण्यासाठी ते प्रवृत्त करीत असल्याची टीका या पत्रातून करण्यात आली आहे. रस्त्यांवर अशाप्रकारचे होर्डिंग्ज ही खालच्या पातळीची मार्केटींग असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

सनी लिओनच्या या जाहिरातीचे होर्डिंग्ज सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. फेसबुक, ट्विटरवर याचा जोरदार विरोध होत असून सनी लिओनीवर टीका केली जात आहे.