हसीना पारकरचे निर्माते आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरविरोधात गुन्हा दाखल...

कपड्यांचं उत्पादन आणि  डिझाईन करणाऱ्या एका कंपनीने अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिच्या आगामी चित्रपट ‘हसीना पारकर’ यांच्या निर्मात्यांवर फसवणूक आणि विश्वासघाताचा आरोप केला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 19, 2017, 02:59 PM IST
हसीना पारकरचे निर्माते आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरविरोधात गुन्हा दाखल...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : कपड्यांचं उत्पादन आणि  डिझाईन करणाऱ्या एका कंपनीने अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिच्या आगामी चित्रपट ‘हसीना पारकर’ यांच्या निर्मात्यांवर फसवणूक आणि विश्वासघाताचा आरोप केला आहे. चित्रपट प्रमोशनदरम्यान एजीटीएम (AJTM) या फॅशन लेबलचा प्रचार न केल्याने कराराचे उल्लंघन झाले असल्याची  तक्रार श्रद्धा कपूर आणि निर्मात्यांविरोधात करण्यात आली आहे.

‘हसीना पारकर’ चित्रपटासाठी श्रद्धाचे कपडे डिझाईन केलेल्या एम अँड एम (M&M) डिझाईन्स कंपनीने मुंबई कोर्टात खासगी तक्रार दाखल केली आहे. २६ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं कंपनीचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सांगितले आहे.

‘एजीटीएम- एजे मिस्त्री अँड थिया मिनहास’ या ब्रँड लेबल अंतर्गत एम अँड एम डिझाइन्स कंपनी कपड्यांचं उत्पादन करते. ‘हसीना पारकर’ चित्रपटाच्या माध्यमातून या कंपनीने पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्रीसाठी कपडे डिझाइन केले होते. ‘चित्रपटासाठी निर्मात्यांना पुरवलेल्या कपड्यांच्या बदल्यात अभिनेत्री श्रद्धा कपूर ब्रँड आणि कंपनीचा प्रचार करण्याचे करारात ठरले होते,’ असे वकीलांनी सांगितले.

त्याचबरोबर ब्रँडचा प्रचार न केल्याने कंपनीला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार असल्याची पूर्ण कल्पना श्रद्धा आणि स्विस एन्टरटेन्मेंटला देण्यात आल्याचेही वकीलांनी म्हटले. परंतु, याबाबत श्रद्धाची कोणतीही प्रतिक्रीया अद्याप मिळू शकलेली नाही.