Sunne Leoneचं मुंबईत भव्य नवीन घर; पती आणि मुलांसोबत थाटात गृहप्रवेश

'आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरूवात...' पाहा सनीच्या नव्या घराचे फोटो

Updated: Jul 15, 2021, 11:51 AM IST
Sunne Leoneचं मुंबईत भव्य नवीन घर; पती आणि मुलांसोबत थाटात गृहप्रवेश  title=

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी एक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतचं एक यशस्वी बिझनेस वुमेन देखील आहे. सनीकडे अनेक प्रॉपर्टी आहेत. पण आता त्यात पुन्हा भर पडली आहे. सनीने मुंबईत भव्य घर खरेदी केलं आहे. नवीन खरेदी केल्याची माहिती खुद्द  सनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटटच्या माध्यमातून दिली आहे. सनीने नव्या घराचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये सनी तिच्या कुटुंबासोबत दिसत आहे. सनीने घराचे तीन फोटो पोस्ट केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोंमध्ये सनीला पती डेनियान उचलून गृहप्रवेश केला आहे. फोटोमध्ये त्यांचे तीन मुलं निशा, नूह आणि अशेर देखील दिसत आहे. त्यांचा तिसरा फोटो अत्यंत खास आहे. तिसऱ्या फोटोमध्ये सनी आणि डेनियान मुलांसोबत पिझ्झा खाताना दिसत आहेत. सनीच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

फोटो शेअर करत सनीने कॅप्शनमध्ये, 'भारतात आमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. याठिकाणी झालेलं माझं घर मला फार आवडतं. हे सुंदर घर आमच्या तीन मुलांसोबत...' असं लिहिलं आहे. सांगायचं झालं तर सनी कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.