सनी आणि तिचा पती डेनियल वेबर यासाठी झालेत ‘न्यूड’

सनी लिओन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आणि 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 28, 2017, 06:18 PM IST
सनी आणि तिचा पती डेनियल वेबर यासाठी झालेत ‘न्यूड’ title=

मुंबई : सनी लिओन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आणि 

आता देखील तसंच कारण देखील आहे. सनी आणि सनीचा नवरा डेनियल वेबर चक्क 'न्यूड' झाले आहेत. आणि त्याला कारण आहे 'पेटा'. पेटासाठी या दोघांनी न्यूड फोटो शूट केलं आहे. 

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी सनी प्राण्यांवर प्रचंड प्रेम करते. गेल्या अनेक वर्षांपासून ती ‘पेटा’ या प्राण्यांसाठी काम करणा-या संघटनेशी जुळली आहे. पेटा प्राणी हित आणि संरक्षणासाठी काम करणारी संस्था आहे. आता सनीने ‘पेटा’साठी एक न्यूड फोटोशूट केले आहे. सनी यात पती डेनियल वेबरसोबत दिसतेय.

Being comfortable in your skin and letting animals be comfortable in theirs’, असा मोलाचा संदेश सनीने यामाध्यमातून दिला आहे.   दरवर्षी शेकडो हजारो प्राण्यांची कातडी मिळवण्यासाठी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात. हे थांबवण्यासाठी सनी आणि डेनियलने फोटोशूट केलं आहे. सनीप्रमाणेच सनीचा पती डेनियल वेबर हा सुद्धा अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत स्टार राहिला आहे. २०११ मध्ये दोघांनीही लग्न केले होते. यानंतर दोघांनीही पॉर्न इंडस्ट्रीला राम राम ठोकला. सनीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. तर डेनियल तिचा बिझनेस मॅनेजर बनला. त्यामुळेच सनी बॉलिवूडमधील आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय पती डेनियलला देते. डेनियलच्या परवानगीशिवाय सनी कुठलाही चित्रपट साईन करत नाही. 

अशी झाली सनी आणि डेनियलची ओळख

सनी व डेनियल सर्वप्रथम लॉस वेगासच्या एका रेस्टारंटमध्ये भेटले. डेनियल तिथे आपल्या बँडसोबत शो करण्यासाठी आला होता तर सनी आपल्या मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी तिथे पोहोचली होती. सनीला पाहताच डेनियल तिच्या प्रेमात पडला. सनी रेस्टारंटमध्ये बसली होती. मग काय, डेनियल तिच्या टेबलापाशी गेला आणि तिचे नाव विचारून परतला. यानंतर सनी त्या रेस्टारंटमध्ये पोहोचली की, एक फुलांचा गुच्छ तिला मिळायचा. अर्थातच हा पुष्पगुच्छ डेनियलने पाठवलेला असायचा. अशा पद्धतीने दोघांनी ओळख झाली आणि मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.