सनी लिओनी तेलगू चित्रपटामध्ये झळकणार

पॉर्न इंड्स्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आलेली सनी लिओनी हे नाव आता भारतीयांच्या ओळखीचं झालं आहे.  

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 3, 2017, 08:06 PM IST
सनी लिओनी तेलगू चित्रपटामध्ये झळकणार  title=

मुंबई : पॉर्न इंड्स्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आलेली सनी लिओनी हे नाव आता भारतीयांच्या ओळखीचं झालं आहे.  

सनीने सारा भूतकाळ मागे सारून नव्याने सुरूवात केली. बॉलिवूडमध्ये स्वतःच्या हिंमतीवर सनी उभीदेखील राहिली. मात्र आता सनी लिओनीने बॉलिवूडमधून टॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.  

टॉलिवूड चित्रपट

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सनी लिओनी लवकरच तेलगू चित्रपटामध्ये झळकणार आहे. हा एक पिरिएड ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी सनी तलवारबाजी, घोडेस्वारी शिकत आहे. सनीला अ‍ॅक्शनपट चित्रपट निवडण्याची इच्छा असल्याचं तिनं म्हटलं आहे. त्यानुसार हा चित्रपट उत्तम स्क्रिपटचा असल्याने या चित्रपटाची निवड केली असल्याची माहिती दिली आहे. सनीच्या  या तेलगू चित्रपटाचे नाव अजूनही ठरलेले नाही. 

हा पहिला प्रयत्न नव्हे 

२०१५ मध्ये आलेल्या ‘डीके’ या कन्नड चित्रपटामध्येही  सनीने ‘सेसम्मा’ या गाण्यावर नृत्य केले होते. त्यानंतर आता सनी तेलगू चित्रपटामध्ये झळकणार आहे.  

बॉलिवूडमध्येही दमदार काम 

अभिनेत्री सनी लिऑनीने ' जिस्म ' ' वन नाईट स्टन्ड', रागिनी एमएमएस-२ हे चित्रपट केले आहेत. नुकताच ' तेरा इंतजार' हा चित्रपट अरबाज खानसोबत तिनं केला आहे.