राजकुमार कोहली यांच्या शोकसभेत हसणारा सनी देओल ट्रोलर्सच्या निशाण्यावर म्हणाले, 'दात दाखवून...'

Sunny Deol brutually trolled Video Video : सनी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 27, 2023, 11:21 AM IST
राजकुमार कोहली यांच्या शोकसभेत हसणारा सनी देओल ट्रोलर्सच्या निशाण्यावर म्हणाले, 'दात दाखवून...' title=
(Photo Credit : Social Media)

Sunny Deol brutually trolled Video : दिग्दर्शक आणि निर्माता राजकुमार कोहली यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाचे कारण हे हार्ट अटॅक होतं. त्यानंतर त्यांच्यासाठी प्रेयर मीट ठेवण्यात आली होती. त्यात अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात जॅकी श्रॉफ, शत्रुघ्न सिन्हा, विंदु दारा सिंह, रितेश देशमुखपासून अनेक कलाकार पोहोचले होते.  या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष हे सनी देओलनं वेधले आहे. त्यानं केलेल्या कृत्यामुळे सोशल मीडियावर तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. खरंतर त्याच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सनी हसताना दिसत आहे. त्यामुळे प्रेयर मीटमध्ये हसनं सनी देओलला महागात पडलं आहे. 

सोशल मीडियावर राजकुमार कोहलीच्या प्रेयर मीटचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील एका व्हिडीओत सनी देओल हा विंदू दारा सिंगसोबत हसताना दिसत आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर रिअॅक्शन दिली आहे. अशा वेळी हसल्यामुळे नेटकरी त्याला ट्रोल केले आहे.

पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सनी देओलच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या रिअॅक्शनविषयी बोलायचे झाले तर एका नेटकऱ्यानं  यासाठीच आपण कलयुगात आहोत. दुसऱ्यानं कमेंट केली की हे प्रेयर मीटमध्ये का हसत आहेत? तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की त्याला त्याचे दात दाखवणं गरजेचं आहे का? आणखी एका नेटकऱ्यानं म्हटलं की इतके दात दाखवून हसायची काय गरज होती? दुसरा नेटकरी म्हणाला, दु:ख असलेल्या ठिकाणी का हसतोय? सनी देओल यावेळी चांगलाच ट्रोल झाला आहे. 

राजकुमार कोहली यांच्या निधनाविषयी बोलायचे झाले तर त्यांचे फॅमिली फ्रेंड विजय ग्रोव्हरनं पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितलं की 24 नोव्हेंबरला त्याचं निधन झालं. ते अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले होते आणि जेव्हा बराचवेळ ते बाहेर आले नाही. तेव्हा त्यांचा मुलगा अरमाननं दरवाजा तोडला तर पाहिलं राजकुमार कोहली हे जमिनीवर पडलेले होते. डॉक्टरांना घरी बोलावलं तर तेव्हा त्यांनी राजकुमार कोहली यांना मृत घोषित केलं. 

हेही वाचा : 'मुलीची इच्छा नाही की मी लग्न करावं'; तमन्नासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर विजय वर्मा असं का म्हणतोय?

दरम्यान, सनी देओल विषयी बोलायचे झाले तर त्यांना सगळ्यात शेवटी ‘गदर 2’ मध्ये पाहण्यात आले होते. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली असेल. चित्रपटानं 525 कोटींचं कलेक्शन केलं. या चित्रपटात पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.