सनी देओल आणि डिम्पल कपाडियाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

 बॉलिवूडमध्ये अफेअर्स आणि गॉसिप्स यांचं नातं अजोड आहे. काही जुनी अफेअर्स अनेक वर्षानंतर अजूनही ताजीतवानी आणि जिवंत आहेत. नुकतंच याचं समोर आलेलं उदाहरण म्हणजे अभिनेत्री डिम्पल कपाडिया आणि सनी देओल.

Updated: Sep 27, 2017, 03:12 PM IST
सनी देओल आणि डिम्पल कपाडियाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अफेअर्स आणि गॉसिप्स यांचं नातं अजोड आहे. काही जुनी अफेअर्स अनेक वर्षानंतर अजूनही ताजीतवानी आणि जिवंत आहेत. नुकतंच याचं समोर आलेलं उदाहरण म्हणजे अभिनेत्री डिम्पल कपाडिया आणि सनी देओल.

सनी देओल आणि डिम्पल कपाडिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लंडनमध्ये एका बसस्टॉपवर डिम्पल आणि सनी एकमेकांचा हात घट्ट धरुन बसलेले या व्हिडिओत दिसत आहेत. या व्हिडिओत दोघंही एकदम रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत.सनी आणि डिम्पल यांचं नातं बघायला गेलं तर जुनं आहे. कारण दोघंही प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगायच्या.

मात्र आता दोघंही वयाच्या साठीत असताना हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सनी आणि डिम्पलने मंझिल मंझिल, गुनाह, अर्जुन, आग का गोला यासारख्या सिनेमात एकत्र काम केलं होतं. नंतर सनी देओल पूजासोबत विवाहबंधनात अडकला, तर डिम्पलने राजेश खन्नाशी लग्नगाठ बांधली होती.

पाहा व्हिडिओ