आणखी एका स्टारकिडचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

'या' चित्रपटातून करणार बॉलिवूड डेब्यू

Updated: Aug 7, 2019, 06:26 PM IST
आणखी एका स्टारकिडचं बॉलिवूडमध्ये पदार्पण title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स डेब्यू करत आहेत. गेल्या वर्षीपासून श्रीदेवीपासून, सैफ अली खानपर्यंतच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. आता या यादीमध्ये अॅक्शन स्टार सुनील शेट्टीच्या मुलाचंही नाव जोडलं गेलं आहे. सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात केली आहे. 

अहान शेट्टी २०१८ साली आलेल्या तेलुगू 'आरएक्स १००' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'पहिलं शूटिंग, पहिला दिवस, पहिला क्लॅप...या सुंदर प्रवासात एकत्र जाण्यासाठी तयार असल्याचं' ट्विट शेअर करण्यात आलं आहे. प्रोडक्शन कंपनी 'नाडियाडवाला ग्रॅंडसन'च्या अधिकृत ट्विटरवरुन शुटिंगची सुरुवात झाल्याचं सांगण्याच आलं. 

'आरएक्स १००' या तेलुगू चित्रपटात कार्तिकेय गुम्माकोंडा आणि पायल राजपूत यांनी भूमिका साकारली होती. 

'आरएक्स १००' या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन मिलन लुथरिया करत आहेत. तर चित्रपटाची निर्मिती नाडियाडवाला ग्रॅंडसन या बॅनरखाली करण्यात येत आहे. अहान शेट्टीच्या या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही.