ब्राह्मण असून मांसाहार करता? सुकन्या मोनेंचे ट्रोलरला सडेतोड उत्तर

Sukanya Mone Non Veg: सध्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाची क्रेझ काही थांबवण्याचं नावं घेत नसून या चित्रपटाची लोकप्रियता अधिकच वाढू लागली आहे. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे सुकन्या मोने यांच्या एक कमेंटची. त्यांनी एका फॅनला चांगला रिप्लाय दिला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 21, 2023, 04:45 PM IST
ब्राह्मण असून मांसाहार करता? सुकन्या मोनेंचे ट्रोलरला सडेतोड उत्तर  title=
July 21, 2023 | sukanya mone reply to a female fan who asked her eating non veg food after being brahmin

Sukanya Mone on Eating Non Veg: सध्या 'बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर 58 कोटींहून अधिक गल्ला भरला आहे. त्यामुळे यावर्षीचा हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक हायएस्ट ग्रोसिंग चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं महिलावर्गांमध्ये आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोबतच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड करतो आहे. 30 जून रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर हा सिनेमा पुर्णत: प्रेक्षकांचा झाला आहे. कुटुंब, मित्रपरिवार, बायकांचा ग्रुप, तरूणपिढी, कॉलेजची मुलं, म्हातारीकोतारी मंडळी सर्वांनी अक्षरक्ष: हा चित्रपट डोक्यावर घातला आहे. काहींनी तर हा चित्रपट दोनदा आणि तिनदा पाहिला आहे. काहींनी तर चार-पाच अथवा दहावेळाही पाहिला असेल. या चित्रपटाचे आणि कलाकारांचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगलीच क्रेझ जमली आहे. 

सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुकन्या मोने यांच्या एक कमेंटची. आता 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद येताना दिसतो आहे. वर म्हटल्याप्रमाणे किती बोलू आणि किती नाही असं सर्वांना झालं आहे. त्यातून सुकन्या मोने यांची भुमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. अशावेळी त्यांनाही कलाकारांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून व मित्रपरिवारांकडून प्रचंड प्रमाणात शुभेच्छा आणि आशीर्वाद येत आहेत. त्यातच लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं लाडक्या सुकन्या मोने यांच्यासाठी एक खास गिफ्ट दिलं आहे. सुकन्या यांनी हा याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे त्यांच्या या गिफ्टची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी सुकन्या मोने यांना हा गिफ्ट प्रचंड आवडलं असून यावेळी त्यांनी अमृताचा आभार मानले आहेत.

 हेही वाचा - जेवल्यानंतर आईस्क्रीम खाणं पडू शकतं महागात; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणं

''याखाली एका महिलेनं कमेंट केली आहे की, तुम्ही ब्राम्हण असून सुद्धा तुम्ही नॉन व्हेज खाता मला वाईट वाटला ऐकून.'' अशी एकानं कमेंट केली आहे. ''सॉरी कोणी सांगितले की मी मांसाहार खाते? आणि कोणी काय खाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही का? आणि ते चांगल की वाईट हेसुद्धा ज्याचे त्याने ठरवायचे असते. मी शाकाहरी आहे''. 

sukanya mone reply to a female fan who asked her eating non veg food after being brahmin

सध्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड होते आहे त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय होतो आहे.