"माझ्या मुलीला बॉयफ्रेन्डने किस केला, तर त्याचे ओठ कापून टाकेन" - शाहरुख असं का बोलला?

सेलिब्रिटी असला तरी शाहरूखला सतत त्याच्या मुलांची काळजी असते.  

Updated: May 15, 2021, 03:16 PM IST
"माझ्या मुलीला बॉयफ्रेन्डने किस केला, तर त्याचे ओठ कापून टाकेन" - शाहरुख असं का बोलला? title=

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरूख खान कायम चर्चेत असतो. शाहरूख नेहमी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करतो. सेलिब्रिटी असला तरी शाहरूखला सतत त्याच्या मुलांची काळजी असते. अनेक  कार्यक्रमांमध्ये किंवा पार्ट्यांमध्ये तो त्याच्या कुटुंबासोबत दिसतो. पण शाहरूख जास्त सुहानाची  काळजी सतावत असते. तो अनेकदा तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत असतो. 

एका मुलाखतीत शाहरूखने सुहानाच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं विधान केलं आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये शाहरूख खानला प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा की,'जर तुझ्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने किस केलं तर तू काय करशील?'

 
 
 
 

 
 
 
 
 
 

तेव्हा शाहरूख खानने उत्तर दिलं की,'माझ्या मुलीला डेट करण्यापूर्वी तो मुलगा हजारवेळा विचार करेल. आणि घाबरेल ही.' तसेच उत्तर देताना शाहरूख खान म्हणाला की,'मी त्या मुलाचे ओढ कापून टाकेन.' यानंतर शाहरूख आणि करण जोहर खूप हसू लागले.

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान एक चर्चेत असलेल्या स्टार किड्समधील एक आहे. अनेकदा ती एका वेगवेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत असते. सुहाना सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत असते. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये राहते.