अकलूज : लावणी कलावंतांचं माहेरघर असलेल्या अकलूजमध्ये यापुढे लावणीच्या घुंगरूंची छमछम ऐकू येणार नाही.
गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचं हे शेवटचं वर्ष असल्याने लावणी कलाकारांनी आपली उत्कृष्ट लावणी सादर करत प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय.
केवळ कलावंताना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खूप खर्च होत असल्याने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारोह समितीच्यावतीने घेण्यात येणा-या या स्पर्धा यापुढे होणार नाहीत. या स्पर्धा बंद होत असल्याने अनेक लावणी कलावंतांना दुख झालंय. या स्पर्धेतून अनेक कलावंत घडले मात्र ही स्पर्धा बंद होत असल्याने हक्काचं व्यासपीठ मिळणार नसल्याची खंत अनेकींना सतावत आहेत.