मोठी बातमी : SSR आत्महत्या प्रकरणी रियाला सीबीआयकडून कोणत्याही क्षणी अटक

या प्रकरणाला एक मोठं वळण येऊ शकतं.

Updated: Aug 30, 2020, 10:39 AM IST
मोठी बातमी : SSR आत्महत्या प्रकरणी रियाला सीबीआयकडून कोणत्याही क्षणी अटक title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यापुढी अडचणींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही रियाची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणाला एक मोठं वळण येऊ शकतं. कारण, रिया सीबीआयच्या प्रश्नांना देत असणारी उत्तरं आणि तिचा आरडाओरडा पाहता आता सीबीआयकडून तिच्या अटकेची तयारी करण्यात येत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. 

दुसऱ्या चौकशी सत्रात रिया गोंधळली 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या रियाची शनिवारी सीबीआयकडून दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिनं आडोओरडा केल्याचं कळत आहे. इतकंच नव्हे, तर ती प्रचंड घाबरल्याचंही म्हटलं जात आहे. सीबीआयच्या टीमनं चौकशीदरम्यान पहिल्या सत्रात रियाला तिचं म्हणणं समोर मांडण्याची संधी दिली. पण, दुसऱ्या दिवशीच्या चौकशीमध्ये मात्र तिचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. अडचणीचे प्रश्न विचारताच रियानं आरडाओरडा करण्यात सुरुवात केली. यावेळी तिला अटकेची भीती असल्याचीच बाब अगदी सहज स्पष्ट होत होती. 

सूत्रांच्या माहितीनुसार हा होता तो प्रश्न... 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयनं रियाला थेट प्रश्न केला, तू आणि सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. एका पत्नीप्रमाणे तू त्याच्यासोबत राहात होतीस. अशा परिस्थितीमध्ये तुला त्याच्या मानसिक परिस्थितीबाबत माहिती होती. मग, यामध्ये तू तुझी जबाबदारी का पार पाडली नाहीस? सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आम्ही तुला अटक का करु नको? तू निर्दोष असलीस तर कोणत्याही  वैज्ञानिक चाचणीसाठी तयार आहेस?

असा प्रश्न उपस्थित करतात, मी निर्दोष आहे असं म्हणत रियानं आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे असल्याचं म्हणत आरडाओरडा करण्यात सुरुवात केली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सीबीआयनं रियावा पूर्ण सहकार्य करण्यास सांगत खालील प्रश्न विचारले... 

- सुशांतच्या आत्महत्येसाठी तू स्वत:ला किती जबाबदार मानतेस? 
- तुझ्यासोबत अचानक बदललेलं नातं सुशांतच्या आत्महत्येमागचं कारण तर नव्हतं? 
- जर तुला वाटत  असेल की तुझ्या जाण्यानंतर सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचललं तर, तुझ्या मनात कोणाला काही सांगण्याचा विचार नाही आला का? 
- जर असा विचार आला, तर त्याबाबत तू कोणाला सांगितलं? 
- सुशांतनं आयुष्य संपवण्याबाबत वगैरे तुला कधी काही सांगितलं होतं? 

 

सीबीआयकडून केल्या गेलेल्या अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं देण्यात रिया असमर्थ होती. आता पुन्हा एकदा तिला सीबीआयच्या प्रश्नांचा मारा सहन करावा लागणार आहे. या प्रश्नांची उत्तर देण्यातही रिया असमर्थ ठरल्यास तिच्यावर पुढील गंभीर कारवाई करण्यासाठी पावलं उचलली जाऊ शकतात असं चित्र दिसत आहे.