जेनेलिया देशमुखला कोरोनाची लागण, रिपोर्ट येताच म्हणाली...

आता समोर आली माहिती....   

Updated: Aug 30, 2020, 09:42 AM IST
जेनेलिया देशमुखला कोरोनाची लागण, रिपोर्ट येताच म्हणाली...  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मराठी आणि हिंदी कलावविश्वासोबतच राजकीय वर्तुळातही चर्चेत असणाऱ्या देशमुख कुटुंबामध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी, जेनेलिया देशमुख हिला कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट तिनं स्वत:च शेअर केली. 

कोरोना चाचणीचा आपला रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर जेनेलियाने एक दिलासादायक पोस्ट केली. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पोस्ट लिहित तिनं आपल्या जीवनातील आव्हानात्मक दिवसांचं चित्र सर्वांपुढं मांडलं. 

'जवळपास तीन आठवड्यांपूर्वी मला कोरोनाची लागण झाली होती. २१ दिवसांपर्यंत मला कोणतीही लक्षणं नव्हती. देवाच्या कृपेनं आज माझ्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला', असं जेनेलियानं लिहिलं. आपल्यावर अरणारे आशीर्वाद आणि सदिच्छांमुळं कोरोनाशी हा लढा अधिक सोपा होता. पण, मागील २१ दिवस अतिशय आव्हानात्मक असल्याची भावनाही तिनं व्यक्त केली. 

 

विलगीकरणात काही दिवस व्यतीत करणं किती कठीण होतं हे सांगत जेनेलियानं वास्तववादी चित्र सर्वांपुढं मांडलं. 'कोणताही फेस टाईम वगैरे एकाकीपणाला मारू शकत नाही. मी आता आपल्या माणसांमध्ये, माझ्या कुटुंबामध्ये परतून फार आनंदात आहे. हीच तुमची खरी ताकद आहे आणि याचीच खरी गरज आहे', असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं. शिवाय सुरुवातीच्याच काळात चाचणी करत योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन तिनं सर्वांना केलं आहे. जेनेलियानं ही पोस्ट केल्यानंतर अनेकांनीच तिच्यापोटी काळजी व्यक्त करत तिच्या चांगल्या आरोग्यासाठी कामना केली.