RRR, बाहुबली आणि ब्रह्मास्त्र विकत घेतला तरी पैसे उरतील इतका बिग बजेट चित्रपट येतोय

एस.एस.राजामौली : प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौली यांचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवतात. बाहुबली, बाहुबली 2 ते आरआर या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक एस एस राजामौली आता बॉलिवूडमध्ये बिग बजेट चित्रपट घेऊन येणार आहेत. एकामागोमाग ब्लॉकबस्टर सिनेमे प्रेक्षकांना देत राजामौलींच्या या नव्या चित्रपटासाठी संपुर्ण बॉलिवूड आणि प्रेक्षकवर्ग वाट बघत आहे.  

Updated: Jan 3, 2024, 07:14 PM IST
RRR, बाहुबली आणि ब्रह्मास्त्र विकत घेतला तरी पैसे उरतील इतका बिग बजेट चित्रपट येतोय title=

 

एस.एस.राजामौली (S.s. Rajamouli) : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली हे गाजलेलं नाव आहे. इंडस्ट्रीतील दिग्दर्शकांच्या टॉप यादीत त्यांचा समावेश आहे,राजामौलींची सर्व  सिनेमे प्रेक्षकांना  थिएटरमध्ये उभं राहून टाळ्या वाजवण्यास भाग पाडतात.  चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरच्या कमाईपासुन ते चित्रपटातील कलाकार, नेपथ्य, गाणी ते ऑस्कर अ‍ॅवार्डपर्यंत एसएस राजामौली यांना आज संपूर्ण जगभर लोक ओळखतात. गेल्या वर्षी त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा पार करून सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करत होते , तर दुसरीकडे त्यांच्या ‘RRR’ चित्रपटाला जागतिक स्तरावर मान मिळला होता. नवीन वर्षात आता चर्चा होतेय ती म्हणजे भारतातील बिग बजेट चित्रपटाची, एस एस राजामौली आता सर्वात महागडा बॉलिवूड चित्रपट करणार आहेत, इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाची चर्चा होत आहे. 

'SSMB29' असं राजामौला यांच्या बिग बजेट चित्रपटाचं  नाव आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं शुटिंग पुर्ण झालं आहे. 2025 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. 

2022-23 मध्ये बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या या चित्रपटांच्या बजेटहून हा सर्वाधीक महागडा चित्रपट चित्रपट आहे. 
2022 मध्ये ऑस्कर अॅवार्डचा पल्ला गाठणाऱ्या 'RRR'चित्रपटाचं  बजेट 550 करोड इतकं होतं, तर 2023 मध्ये सर्वाधीक चर्चेत असलेले सिनेमे आदिपुरुष, जवान , पठाण या सिनेमांचं बजेट अनुक्रमे 700 करोड, 300 करोड, 250 करोड आहे. हे चार ब्लॉकबस्टर चित्रपट विकत घेऊनही राजामौली यांच्या नव्या चित्रपटासाठी  400-500 कोटी उरतील.
 

राजामौलींच्या या चित्रपटाचं बजेट किती ? 
भारतातील सर्वाधिक महागडा अशी चर्चा असलेला राजामौलींचा 'SSMB29'या नव्या  चित्रपटाचं    1500 कोटीं इतकं बजेट आहे. 
 
 

कोण असतील स्टार कास्ट 
या चित्रपटात स्टार कास्टमध्ये साऊथचा युथ क्रश महेश बाबू प्रमुख भुमिकेत दिसुन येणार असल्याची चर्चा होत आहे. तसंच या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील नावाजलेले कलाकार दिसुन येणार आहेत. अभिनेता अजय देवघण, दीपिका पदुकोण, राणा दग्गुबात्ती, सोनु सुद, संजय दत्त हे कलाकार सहाय्यक भुमिकेत दिसुन येणार आहेत.