श्रीदेवीने या अभिनेत्यांच्या मुलासोबतही सिनेमात काम केलं

श्रीदेवी अशा निवडक अभिनेत्रींपैकी एक आहे की, तिने धमेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल सोबतही चित्रपटात काम केलं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 25, 2018, 06:43 PM IST
श्रीदेवीने या अभिनेत्यांच्या मुलासोबतही सिनेमात काम केलं title=

मुंबई : श्रीदेवीचं शनिवारी कार्डियक अरेस्टने निधन झालं. श्रीदेवी दुबईत एका लग्नात असताना ही घटना घडली. श्रीदेवी अशा निवडक अभिनेत्रींपैकी एक आहे की, तिने धमेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल सोबतही चित्रपटात काम केलं आहे. 

राजेश खन्नासोबत हिट

नया कदम (1984), मक़सद (1984), मास्टरजी (1985) आणि नज़राना (1987)मध्ये राजेश खन्नासोबत जोडी यशस्वी ठरली.

चांदनीमुळे आणखी प्रसिद्धी

१९८९मध्ये आलेल्या चांदनी चित्रटात श्रीदेवाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली, यश चोपडा यांच्या फेवरिट हिरोईनमध्ये श्रीदेवीचं नाव घेण्यात आलं. यानंतर यश चोपडाच्या लम्हेंमध्ये श्रीदेवीने काम केलं.