राकेश बापटची पूर्व पत्नी आणि अरूण जेटली यांचं खास कनेक्शन...

बिग बॉस ऑटीटीचा कंटेस्टेंट राकेश बापट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

Updated: Sep 18, 2021, 07:41 AM IST
राकेश बापटची पूर्व पत्नी आणि अरूण जेटली यांचं खास कनेक्शन...   title=

मुंबई : बिग बॉस ऑटीटीचा कंटेस्टेंट राकेश बापट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती म्हणून आज त्याची ओळख निर्माण झाली आहे. बॉग बॉसच्या घरात त्याचं नाव अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीसोबत जोडलं जात आहे. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी देखील पसंती दर्शविली आहे. शमितासोबत रिलेशनमध्ये असलेल्या राकेश बापटचं लग्न प्रसिद्ध अभिनेत्री रिद्धी डोगरासोबत झालं. पण लग्नानंतर अवघ्या सात वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

सध्या राकेशच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य़ाबद्दल तुफान चर्चा रंगत असतात. राकेशने 2001 साली प्रदर्शित झालेल्या 'तुम बिन'च्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. चित्रपटात राकेशने अमर शाह व्यक्तीरेखा साकारली. चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर राकेश  'दिल विल प्यार व्यार' (Dil Vil Pyar Vyar)चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चित्रपटांमध्ये यश मिळत नसल्याचं लक्षात येताचं त्याने मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. त्याने 'सात फेरे: सलोनी का सफर', 'मर्यादा: लेकिन कब तक?', 'कुबूल है', 'बहू हमारी रजनीकांत' यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली.  'मर्यादा: लेकिन कब तक?' मालिकेत राकेशला त्याच्या आयुष्यातील खास व्यक्ती भेटली. ती म्हणजे रिद्धी डोगरा. 

मालिकेत एकत्र काम करत असताना त्यांच्यातील जवळीत वाढली. या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2011 साली राकेश-रिद्धीने लग्न केलं. पण 2019 मध्ये दोघांनी सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचं म्हणजे राकेश पत्नी आणि अभिनेत्री रिद्धी ही भाजप दिवंगत नेते अरूण जेटली यांची भाची आहे. अरुण जेटली यांची पत्नी ही रिद्धीची आत्या आहे.