ठरलं....या तारखेला अक्षय कुमारचा सूर्यवंशी सिनेमा होणार रिलीज

अक्षय कुमार आणि कॅट्रिना कैफचा सूर्यवंशी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सिनेमाची रिलीज डेट लांबणीवर पडलेली होती. मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Updated: Mar 14, 2021, 01:41 PM IST
ठरलं....या तारखेला अक्षय कुमारचा सूर्यवंशी सिनेमा होणार रिलीज  title=

मुंबई : अक्षय कुमार आणि कॅट्रिना कैफचा सूर्यवंशी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सिनेमाची रिलीज डेट लांबणीवर पडलेली होती. मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

३० एप्रिलला सूर्यवंशी सिनेमा रिलीज होणार आहे. स्वत: अक्षय कुमारने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अक्षयने म्हटलंय, की ‘अखेर तुमची प्रतीक्षा संपली आहे. आर रहीं है पुलिस’

 

अक्षय आणि कॅट्रिनाशिवाय या सिनेमात रणवीर सिंह आणि अजय देवगणही प्रमुख भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांनंतर एक तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या वर्षीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. ज्याला ८ कोटींहून जास्त व्यूज मिळाले होते. करण जोहरने या सिनेमाचा निर्माता आहे. त्यानेही ट्विट करत प्रेक्षकांना आवाहन केलंय, की ३० एप्रिल ही तारीख तुम्ही सूर्यवंशी सिनेमासाठी राखून ठेवा. रोहीत शेट्टीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

ट्विटरवरही फॅन्सनी सिनेमाची रिलीज होण्याची तारीख समोर आल्यानंतर उत्सुकता दाखवली आहे. खिलाडी इज बॅक असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.