VIDEO: कोर्टानं निर्दोष मुक्त केल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात जाऊन Sooraj Pancholi नं घेतलं दर्शन, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Sooraj Pancholi at Siddhivinayak Temple: जिया खानच्या प्रकरणात आरोपी अभिनेता सुरज पांचोलीला निर्दोष मुक्तता (Sooraj Pancholi) मिळाल्यानंतर आता तो श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आला होता. यावेळी त्यानं श्री सिद्धिविनायकाचा दर्शन घेतले परंतु त्याला नेटकऱ्यांनी (Sooraj Pancholi Video) ट्रोलही केले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Apr 30, 2023, 05:12 PM IST
VIDEO: कोर्टानं निर्दोष मुक्त केल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात जाऊन Sooraj Pancholi नं घेतलं दर्शन, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल title=

Sooraj Pancholi at Siddhivinayak Temple: जिया खान हिच्या मृत्यूप्रकरणात अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला (Sooraj Pancholi Verdict) काल निर्दोषमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयात काल सूरज पांचोलीला मोठा दिलास मिळाला आहे. आपल्याला निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर सूरज पांचोलीनं इन्टाग्रामवर स्टोरीसुद्धा पोस्ट केली होती. त्याच्या चाहत्यांनाही त्याच्या या आनंदात सहभाग दर्शवला होता. त्यामुळे सध्या सूरज पांचोली हा बराच चर्चेत आहे. काल सूरजला न्यायालयानं दिलासा (Sooraj Pancholi at Siddhivinayak Temple) दिल्यानंतर आज सूरज हा श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाला आला होता. यावेळी त्यानं श्री सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले परंतु काहींनी त्याला ट्रोलही केले आहे.

सध्या त्याचा हा व्हिडीओ इन्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो श्री सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर दिसला. यावेळी त्यानं ट्रॅक पॅन्ट आणि जॅकेट असे कपडे घातले होते आणि कॅप परिधान केली होती. यावेळी त्याला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की सूरज वेस्टर्न लुकमध्ये (Sooraj Pancholi Trolled) आला आहे. त्यानंतर तो श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतो आणि मग मंदिरातून बाहेर येतो त्यानंतर त्यानं अंगावर शाल पाघंरलेली असते व कपाळावर केशरी टिळा लावला होता व हातात गणपतीची तजबीर होती. (sooraj pancholi visited siddhivinayak temple video goes viral on social media)

यावेळी सूरजला ट्रोलर्सनी ट्रोल केलं आहे. एका यूझरनं लिहिलंय की, एका फ्लॉप चित्रपटापासून व्हीआयपी स्टेटसपर्यंतही सुविधा मिळते. कमालच आहे. तर दुसऱ्यानं लिहिलंय की, आधी चप्पलांना आत लावलास मग देवाच्या फ्रेमला. अशी लोकं मंदिरात जातात तरी कशाला? तर तिसऱ्यानं लिहिलं आहे की, अशा गुन्हेगारांना फूकटचं फूटेज देऊ नका. तर अजून एका युझरनं लिहिलंय की, तूला या कोर्टात निर्दोषमुक्तता मिळाली परंतु तूला तूझे कर्म हे भोगावे लागतील. हा व्हिडीओ @viralbhayani नं इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे.  

सूरज पांचोली हा अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री जहिना वहाब (Aditya Pancholi) यांचा मुलगा आहे. 2013 साली जिया खानच्या मृत्यूप्रकरणी त्याला आरोपी ठरविण्यात आले होते. जिया खानच्या पत्रातही त्यानं त्रास दिल्याचा आरोप होता. त्याचसोबत जिया खानच्या आईनंही सूरज पांचोलीवर नानातऱ्हेचे आरोप केले होते. त्यामुळे सूरज पांचोलीच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यानंतर सूरजला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. त्यानंतर हा खटला सुरूच होता. परंतु काल 28 एप्रिल रोजी त्याला सीबीआयनं घेतलेल्या विशेष सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता देण्यात आली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुराव्यांअभावी त्याला ही मुक्तता न्यायलायानं दिली आहेत. यावर जिया खानच्या आईनं आपण यापुढे हायकोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे. आपल्यावर हा न्यायालयीन खटका सुरू असताना सूरजनं 2015 साली 'हिरो' या चित्रपटातूनही काम केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अथिया शेट्टी झळकली होती.