नवी दिल्ली : बॉलिवूड सिनेमा 'बाहुबली'तल्या 'भल्लाळदेव'च्या रुपात प्रेक्षकांसमोर येणाऱ्या अभिनेता राणा दग्गुबातीला हॉलिवूडचं तिकीट मिळालंय.
राण दग्गुबातीनं 'बाहुबली' आणि 'बाहुबली २'मध्ये नकारात्मक भूमिका असूनही प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान मिळवलं. त्यामुळेच की काय त्याची परदेशातही मागणी वाढलीय. यानंतर राणानं आपल्या पहिल्या वहिल्या इंटरनॅशनल प्रोजेक्टची घोषणा केलीय.
राणानं दिलेल्या माहितीनुसार, यूकेच्या स्टुडिओ 'द लंडन डिजिटल मुव्ही अॅन्ड टीव्ही स्टुडिओज'नं त्याला एशियन अॅम्बेसेडर बनवलंय. यानंतर राणा दग्गुबातीनं त्यांच्यासोबत एक सिनेमाही साईन केलाय. या सिनेमाची सुरुवात २०१८ साली सुरू होण्याची शक्यता आहे.
याशिवाय राणा सध्या आपल्या आगामी 'नेने राजू नेने मंत्री' या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तयारीला लागलाय. हा सिनेमा तेजानं दिग्दर्शित केलाय. हा एक पॉलिटिकल ड्रामा आहे. राजकारणात काहीतरी करू पाहणाऱ्या एका व्यक्तीच्या भूमिकेत राणा दिसतोय. या सिनेमात राणासोबत 'सिंघम'फेम काजल अग्रवालही दिसणार आहे. हा सिनेमा तेलुगु, तामिळ आणि मल्याळम भाषेत ११ ऑगस्टला प्रदर्शित होईल.