सोनम कपूरची बहिण रियाची इमोशनल पोस्ट

सोनम कपूरची बहिण रिया कपूरनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. 

Updated: May 9, 2018, 07:47 AM IST
सोनम कपूरची बहिण रियाची इमोशनल पोस्ट title=
मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरने तिचा बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत विवाहबंधनात अडकली. मुंबईत पार पडलेल्या या लग्न सोहळ्यानंतर संध्याकाळी ग्रॅन्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. सोनम कपूरचं लग्न कपूर कुटुंबातील कविता सिंह यांच्या हॅरिटेज बंगल्यामध्ये झाले.शीख रीतिरिवाजानुसार सोनम आणि आनंद विवाहबंधनात अडकले. कपूर कुटुंबीयांप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहचले होते. सोनम कपूरची बहिण रिया कपूरनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. 

रियाने लिहिली इमोशनल पोस्ट 

सोनम कपूरची बहिण रियाच्या खूप जवळची आहे. सोनमसोबतचा फोटो तिने शेयर केला आहे. यावर तिने छानशी कॅप्शनही दिली आहे. ''कायम. मला माहिती आहे बहिणीचं प्रेम सर्वात खर असतं. ममी आणि सोनम कपूर-आहूजा.''
 

Forever and ever. Sister love is the truest love I know. Me and Sonam Kapoor-Ahuja 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor) on

बॉलिवूडची हजेरी  

सोनम कपूर आणि आनंद अहुजाला शुभेच्छा देण्यासाठी कपूर कुटुंबीयांसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. वरूण धवन, जॅकलीन फर्नांडिस, बच्चन कुटुंबीय, करीना कपूर, करिष्मा कपूर यांसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

सोशल मीडीयात बदल 

लग्नानंतर अवघ्या काही तासामध्येच सोशल मीडियामध्ये सोनम कपूरने तिचे नाव बदलले आहे. सोनमच्या इंस्टाग्राम  अकाऊंटवर तिचे नाव सोनम कपूर अहुजा असे करण्यात आले आहे.