सोनम कपूरला का नको झालं बॉलिवूड?

सोनम पुढे म्हणाली, "ही पहिली वेळ आहे की, मी आणि आनंद एवढे दिवस एकमेकांसोबत आहोत.

Updated: Jul 6, 2021, 01:09 PM IST
सोनम कपूरला का नको झालं बॉलिवूड? title=

मुंबई : जेव्हा केव्हा बी-टाऊनची बात होते , तेव्हा नेपोटीझम, स्टार किड सारख्या गोष्टींमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला ट्रोल केलं जाते. यात सर्वांत जास्त सेलिब्रिटी किड्सवर  निशाणा साधला जातो. पण आता एका स्टार किडनेच थेट बॉलिवूडमधील नवरा नको असं स्टेंटमेंट केलंय, जे सध्या चांगलच चर्चेत आहे.

बॉलिवूडची फॅशनिस्टा अभिनेत्री सोनम कपूर तिच्या हटके स्टाईलिंगमुळे विशेष चर्चेत असते. सिनेस्क्रीनपासून जरी ती सध्या दुर असली तरी सोशल मीडियावर ती  चांगलीच अॅक्टीव्ह असते.  सध्या सोनम पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनम तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भरभरून  बोलली. यावेळी तिने "बॉलिवूडमधल्या कोणत्याही व्यक्तीशी लग्न केलं नाही हे चांगलंच झालं" असं म्हटलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoo

सोनम पती आनंदचं कौतुक करत म्हणते, "मी खूप नशीबवान आहे की मी एका अशा व्यक्तीला भेटले ज्याचे विचार माझ्यासारखेच आणि स्त्रीवादी आहेत. देवाचे खूप  आभार की मी बॉलिवूडशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी लग्न केलं नाही. असं झालं असतं तर मग माझं जग खूपच सिमित राहिलं होतं. मला फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये  काय चाललं आहे याचीच माहीत मिळाली असती."

सोनम कपूरने 2018 मध्ये बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केलं होतं.

सोनम पुढे म्हणाली, "ही पहिली वेळ आहे की, मी आणि आनंद एवढे दिवस एकमेकांसोबत आहोत. कारण आम्ही दोघं कामाच्या निमित्तानं बराच प्रवास करतो.  त्यामुळे एकमेकांसाठी आम्हाला फार कमी वेळ मिळतो. या काळात आम्हाला दोघांनाही जाणवलं की, आमचं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे आणि  एकमेकांसाठी आम्ही किती वेडे आहोत. सध्या आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ व्यतित करत आहोत."

या मुलाखतीत सोनमनं अभिनेता आणि अभिनेत्रीच्या मानधनातील फरकाबाबत देखील भाष्य केलं. याबाबत बोलताना ती म्हणाली, "या इंडस्ट्रीमध्ये पुरुष आणि  स्त्रीयांच्या मानधनातील फरक ही हास्यस्पद गोष्ट आहे. मी यावर बोलेन या सर्वांच्या विरोधातही जाईन. पण यामुळे मला हव्या तशा भूमिका मिळणार नाही. यामुळे मला  काहीच समस्या नाही कारण मी हे नुकसान सहन करू शकते."

सोनम कपूर लवकरच 'ब्लाइंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनम एका ब्लाइंड पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.