दिशा पाटनीचा 'Kiss Me More'गाण्यावर भन्नाट डान्स; श्रॉफ कुटुंबाकडून कमेन्टचा पाऊस

पाहा दिशा पाटनीच्या भन्नाट डान्स व्हिडिओ....

Updated: Jul 6, 2021, 11:25 AM IST
दिशा पाटनीचा  'Kiss Me More'गाण्यावर भन्नाट डान्स; श्रॉफ कुटुंबाकडून कमेन्टचा पाऊस title=

मुंबई : अमेरिकन सिंगिंग सेंसेशन आणि रॅपर DojaCat आपल्या गाण्यांच्या जोरावर  चाहत्यांचं लक्ष वेधत असते.  तिच्या  गाण्यांवर सेलिब्रिटी देखील फिदा असतात. अनेक सेलिब्रिटी तिच्या  गाण्यांवर थिरकतात देखील. DojaCatच्या गाण्यांवर थिरकण्याचा मोह बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीला देखील आवरला नाही. दिशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये   'Kiss Me More' या गाण्यावर ती भन्नाट डान्स करताना दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आतापर्यंत अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेन्ट केल्या आहे. महत्त्वाचं म्हणजे श्रॉफ कुटुंबाने देखील दिशाच्या या डान्स व्हिडिओवर कमेन्ट आणि लाईक्सचा  पाऊस पाडला आहे. अभिनेता टायगर श्रॉफसह  बहिण कृष्णा श्रॉफ आणि आई आयशा श्रॉफने देखील दिशाच्या व्हिडिओवर कमेन्ट केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशाच्या डान्सवर टायकर कमेन्ट करत म्हणाला, 'कूल' तर कृष्णा म्हणाली,  सुपर क्यूट' म्हणाली आहे. श्रॉफ कुटुंबाला देखील दिशाचा हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. असं म्हणायला हरकत नाही. 

टायगर आणि दिशाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, टायगर अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत 'बागी 3' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता. आता तो   'हिरोपंती 2' चित्रपटात अभिनेत्री तारा सुतारियासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. दिशा सलमानच्या 'राधे: योर मोस्‍ट वॉन्‍टेड भाई' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती.