आई-वडिलांच्या छायेत Vayu Kapoor Ahuja; सोनमच्या लेकाची पहिली झलक

सोनम कपूरने इन्स्टाग्रावर खास पोस्ट शेअर करत दाखवली लेकाची पहिली झलक; सोशल मीडियावर वायूच्या व्हिडीओची चर्चा   

Updated: Nov 22, 2022, 09:01 AM IST
आई-वडिलांच्या छायेत Vayu Kapoor Ahuja; सोनमच्या लेकाची पहिली झलक title=

Vayu Kapoor Ahuja First Look: गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री सोनम कपूर (sonam kapoor,) मोठ्या पडद्यापासून लांब आहे. सध्या सोनम कपूर मातृत्वाचा आनंद घेत आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील सोनमने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनम पती आनंद अहूजा (anand ahuja) आणि मुलगा वायू कपूर अहूजासोबत वेळ व्यतीत करताना दिसत आहे. (vayu kapoor ahuja)

सोनमची खास पोस्ट

सोनम कपूर आणि आनंद अहूजा कारमध्ये फिरताना दिसत आहेत. यावेळी सोनमने लेकाची पहिली झलक देखील दाखवली आहे. खुद्द सोनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'Sweet Nothings' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनमच्या पोस्टवर पतीची कमेंट
सोनमच्या व्हिडीओवर आनंद अहूजाने कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कमेंट करत तो म्हणाल 'संपुर्ण जगा भोवती माझ्या जगासोबत...' सध्या सोनमची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोमनच्या व्हिडीओवर फक्त चाहत्यांनीच नाहीतर सेलिब्रिटींनी देखील लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनमने 20  ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. (Sonam Kapoor Gave Birth To A Boy) सोनमनं तिच्या मुलाचं नाव वायू-कपूर आहूजा (Vayu Kapoor Ahuja) असं ठेवलं आहे. सोनमनं खास पोस्ट शेअर करत तिच्या बाळाचं नाव जाहीर केलं आहे. 

प्रत्येक गोष्टीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देणाऱ्या सोनम कपूरने अद्याप मुलाचा चेहरा दाखवला नाही. सध्या प्रत्येक जण सोनमच्या लेकाला पाहण्याच्या प्रतीक्षेत आहे.