धडक : जान्हवीच्या अभिनयाबद्दल काय म्हणाली सोनम कपूर

काय म्हणाली सोनम कपूर 

धडक : जान्हवीच्या अभिनयाबद्दल काय म्हणाली सोनम कपूर  title=

मुंबई : जान्हवी कपूरचा पहिला हिंदी सिनेमा 'धडक' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ईशान खट्टरसोबत जान्हवी बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये हे दोघेही बिझी आहेत. या सिनेमाची चर्चा जोरदार रंगली असताना 20 जुलै रोजी हा सिनेमा सिनेमागृहात घरात येणार आहे. या सिनेमाबद्दल सगळीकडून कौतुक होत असताना आता अभिनेत्री आणि जान्हवीची मोठी बहिण सोनम कपूरेन देखील आपलं मत सांगितलं आहे. 

सोनम कपूरने ट्विट केलं आहे ती म्हणते की, जान्हवी कपूर तू धडाकेदार डेब्यू केलं आहेस. मला तुझा अभिमान आहे. तुझं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. ईशान खट्टरने तू देखील या सिनेमांत कमाल केलं आहे. या सिनेमाचं क्रेडिए शशांक खैतानला केलं पाहिजे.

आपल्याला माहितच आहे. मराठीतील ब्लॉकब्लस्टर ठरलेल्या 'सैराट' या सिनेमाचा धडक हा सिनेमा रिमेक असून याची सगळीकडे चर्चा होत आहे. करण जोहर स्टार किड्सच्या डेब्यूमध्ये अग्रेसर असतो. या सिनेमातून त्याने जान्हवी आणि ईशानला बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे.