याला म्हणतात सुखात नांदणे! सोनम कपूरच्या नवऱ्याचं 173 कोटींचं घर पाहिलं का?

Sonam Kapoor Delhi House : सध्या चर्चा आहे ती म्हणजे सोनम कपूरच्या दिल्लीच्या घराची. तिचे हे घरं सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलं आहे. तुम्हाला माहितीये का की तिचे हे घरं 173 कोटींचे आहे. तुम्हाला माहितीये का या घराची वैशिष्ट्ये काय आहेत? 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 23, 2023, 11:02 AM IST
याला म्हणतात सुखात नांदणे! सोनम कपूरच्या नवऱ्याचं 173 कोटींचं घर पाहिलं का?  title=
Sonam Kapoor Delhi House worth of 173 crore rupees inside photos latest entertainment news in marathi (Photo : Sonam Kapoor Instagram)

Sonam Kapoor Delhi House : सोनम कपूरच्या लहान मुलाचा वाढदिवस नुकताच 20 ऑगस्टला साजरा झाला. सोनमनं आपल्या लेकाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. वायूच्या बर्थडे सेलिब्रेशनची सगळीकडेच चर्चा रंगलेली होती. अगदी साधेपणानं सोनमनं आपल्या लेकाचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी तिनं आपल्या सासरी लेकाचा वाढदिवस साजरा केला असून सोनम कपूर, पती आनंद अहूजा, सोनमचे सासू सासरे आपल्या लाडक्या नातव्याच्या वाढदिवसाला उपस्थित होते. सध्या त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

यावेळी तिच्या घराचेही फोटोही पाहायला मिळत आहेत. सोनमचे हे घर दिल्लीचं आहे. दिल्लीच्या गल्लीत वैगेरे काही नाही अगदी मोठ्या एरियामध्ये सोनमचं हे घर आहे. या घराची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या घराचा एरिया हा 28, 530 sq ft आहे आणि या घराची किंमत ही तब्बल 173 कोटी रूपये इतकी आहे. 

तुम्ही पाहू शकाल की तिनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये फार लॅविश इंटेरिअर पाहायला मिळते आहे. सोबतच तिच्या घरात अनेक एक्सक्लूझिव्ह फर्निचर आहे. अगदी पारंपरिक पद्धतीनं केलेले लाकडाचे फर्निचर असो वा काचेचे डेकोरेटिव्ह डिझाईन्स असो. तिच्या या आलिशान बंगल्यामध्ये नक्की काय काय आहे याची प्रचिती येते. बेडरूमपासून, वॉशरूमपर्यंत, स्टडीरूमपासून ते अगदी किचनपर्यत सर्वत्रच तुम्हाला श्रीमंत पाहायला मिळेल. त्यामुळे तिच्या या घरात आपल्यालाही एकाच तरी राहावसं वाटेलच नाही का? तिच्या या घरातील डायनिंग रूमकडे पाहूनही तुमचे डोळे टिपतील, इतकं सुंदर हे तिचं घर आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिच्या या आलिशान घरातील फोटोंनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

सासुबाईंचा सुनेसाठी खास बेत, जाणून घ्यायचाय? हेही वाचा : वनिता खरातसाठी सासूबाईंनी केला खास बेत, केले सूनचे खूप लाड; पाहा Photo

सोनमनं शेअर केले फोटो : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनम कपूरच्या घराची खास वैशिष्ट्ये : 

  • वर म्हटल्याप्रमाणे, सोनम कपूरचे घर हे 26,530 sq ft चे आहे. या घराची किंमत ही 173 कोटी रूपये इतकी आहे. दिल्लीच्या अगदी पॉश एरियामध्ये हे घर स्थित आहे. 
  • सोनम कपूरच्या घरात अगदी लायब्ररीप्रमाणे भरपूर पुस्तकं आहेत, खासकरून ही आनंद अहुजाची असावीत. 
  • तिच्या घरात अनेक जून्या पद्धतीचे, अन्टिंक्स आणि विंटेज पद्धतीचे फर्निचर पाहायला मिळते. 
  • तिच्या घराचा गार्ड एरिया हा सर्वात जास्त पाहण्याजोगा आणि विशेष आहे. 
  • सोनम कपूर हिचे हे घर रॉयल फॅमिलीलाही टक्कर देते. 
  • घरात सुंदर असे देवघर आहे.