सोनलीच्या प्रकृतीबद्दल नवरा गोल्डी बेहेलचे खास ट्वीट!

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला झालेल्या कॅन्सरमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांना जबर धक्का बसला.

Updated: Aug 3, 2018, 12:31 PM IST
सोनलीच्या प्रकृतीबद्दल नवरा गोल्डी बेहेलचे खास ट्वीट! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला झालेल्या कॅन्सरमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांना जबर धक्का बसला. याची माहिती खुद्द सोनालीने सोशल मीडियाद्वारे दिली. सध्या सोनाली न्यूयॉर्कमध्ये यावर उपचार घेत आहे. त्याचबरोबर तिच्या प्रकृतीतील बदल, अपडेट्स ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोहचवत आहे. सोनाली बेंंद्रे सामना करत असलेला High Grade Cancer म्हणजे नेमके काय ?

 

काही दिवसांपूर्वी सोनालीच्या नणंदेने तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. पाहा- काय म्हणाली होती ती? त्यानंतर सोनालीच्या नवऱ्याने सोनालीच्या प्रकृतीबद्दल खुलासा केला आहे.

काय केले ट्वीट?

जुलै २०१८ मध्ये सोनालीच्या कॅन्सर ट्वीटने सर्वांना हादरवून सोडले. त्यानंतर बॉलिवूडकरांनी, चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा, प्रार्थनांचा वर्षाव केला. या शुभेच्छांसाठी आभार मानण्यासाठी गोल्डी बेहेल याने खास ट्वीट केले. यात तो म्हणतो, सोनालीला दिलेल्या प्रेम आणि आधाराबद्दल सर्वांचे आभार. ती आता स्थिर आहे आणि कोणत्याही अडचणींशिवाय ट्रिटमेंट घेत आहे. हा खूप लांबचा प्रवास आहे. पण त्याची सुरुवात तरी आम्ही पॉजिटीव्हली केली आहे. 'या' अभिनेत्रीचे पत्र वाचून कॅन्सरशी सामना करणाऱ्या सोनालीला रडू कोसळले!

Thank you all for the love and support for Sonali... she is stable and is following her treatment without any complications. This is a long journey but we have begun positively.

सोशल मीडियावर अपडेट्स

सोनालीची कॅन्सरवरील ट्रिटमेंट चालू असताना तिने स्वतःचे मोठे केस कापले. त्या नव्या लूक्सचे फोटोजही तिने सोशल मीडियावर शेअर केले. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी तिने आपल्या मुलासोबतचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली. 

 

छोट्या पडद्यावर सोनालीची धूम

सोनाली बेंद्रेने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली. सिनेमांपासून दूर राहिलेली सोनाली छोट्या पडद्यावर मात्र सक्रिय होती.