मुंबई : भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांच्या हत्येचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर सांगवानने दिल्याची माहिती गोवा पोलिसांतील सूत्रांनी दिलीय. सुधीर सांगवानची गोवा पोलिसांनी कोठडीत कसून चौकशी केली. फोगट यांना शुटिंगचं कारण देऊन गुडगावमधून गोव्याला आणणं हा ही कटाचा हिस्सा होता असं सांगवानने म्हटलंय. हा कट अनेक महिन्यांपासून शिजत होता अशी माहिती उघड होत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश दिलेत. (Sonali Phogat Death case)
कुटुबियांचा गंभीर आरोप (Sonali Phogat family)
सांगवानने सोनाली फोगाटला याआधीही विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप सोनाली फोगाटच्या कुटुंबियांनी केला होता. सांगवानचा सोनालीच्या मालमत्तेवर डोळा होता असा आरोपही त्यांनी केलाय. सोनाली यांच्या गुरुग्राम फार्महाऊसवर सुधीर सांगवानने कब्जा केला होता. सोनालीच्या गोवा दौऱ्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा दावाही तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
भाजप नेता आणि सोशल मीडिया स्टार (Social Media star) सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. सोनाली फोगाट यांच्या शरीरावर जखमांच्या 46 खूणा आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे सोनाली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला त्यावेळी त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे एकुण तपासकार्यावर आता संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, . सोनाली यांना 15 वर्षांची एक मुलगी (Sonali Phogat daughter)असून तिचं नाव यशोधरा (Yashodhara Phogat) आहे. आई-वडिलांची सावली गेल्यानंतर कुटुंबीयांनी सांगितले की यशोधराच्या जीवाला धोका आहे. यशोधरा हिच्या वडिलांच्या मृत्युचं गूढ सहा वर्षांनंतरही समोर आलेलं नाही तर दुसरीकडे आई सोनालीचा मृत्यु झाला.